थोडक्यात महत्त्वाचे

रेल्वेच्या धडकेमुळे म्हशीचा मृत्यू

मुंबई लोकल (प्रतीकात्मक छायाचित्र )

ठाणे – कळव-मुंब्रा स्थानकाच्या दरम्यान जलद लोकलगाडीची धडक लागून म्हशीचा मृत्यू झाला. त्यामुळे गाड्या अर्धा घंटा विलंबाने धावत होत्या. सकाळी साडेदहाला ही घटना घडल्यामुळे १ घंटा रेल्वेवाहतूक खोळंबली. गाडी आणि चाके यांमध्ये अडकलेल्या म्हशीला काढण्यात तेवढा वेळ लागला.


गिरणी कामगारांना मुंबईत घरे शक्य ?

प्रतीकात्मक छायाचित्र

मुंबई – गिरणी कामगारांना मुंबईत घरे कशी उपलब्ध करून देता येणे शक्य आहे, असे राष्ट्रीय मिल मजदूर संघाने उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माणमंत्री यांना सविस्तर पत्र देऊन सांगितले. सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या बैठकीत संघाने याविषयी सरकारने दिलेल्या आश्वासनाविषयी आठवण करून दिली.


कुत्र्याच्या पिल्लाला इमारतीवरून फेकले !

मुंबई – पवई येथील एका इमारतीतील सुरक्षारक्षकाने इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून कुत्र्याला खाली फेकले. रहिवाशांनी त्वरित त्याला रुग्णालयात भरती करून उपचार केले. त्यानंतर त्या सुरक्षारक्षकाला त्याची नोकरीवरून काढून टाकण्यात आले. या प्रकरणी सुरक्षारक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका 

क्रूरतेची परिसीमा


मुंबईत १३ कोटी रुपयांचे मॅफेड्रॉन जप्त, ५ जण अटकेत !

प्रतीकात्मक चित्र

मुंबई – पोलिसांनी अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या ५ जणांना अटक केली आहे. त्यांच्या टोळीकडून १३ कोटी रुपये किंमतीचे मॅफेड्रॉन (एम्. डी.) जप्त करण्यात आले.


  • अंत्यसंस्कारानंतर महिलेची राख आणि अस्थी गहाळ !

  • असंवेदनशील समाज !

नाशिक – बागलाण तालुक्यातील नामपूर येथे अंत्यसंस्कारानंतर महिलेची राख आणि अस्थी गायब झाल्या. अंगावरील सोन्याचे दागिने मिळवण्यासाठी किंवा अघोरी विद्येच्या उद्देशाने हा प्रकार केल्याची शक्यता आहे. सुरेखा दीपक खैरनार (वय ४० वर्षे) असे मृत महिलेचे नाव आहे. खैरनार कुटुंबियांनी स्मशानभूमीत राख आणि अस्थी शोधण्याचा प्रयत्न केला; पण काहीच सापडले नाही.


१ जूनपासून मासेमारीला बंदी

प्रतीकात्मक छायाचित्र

रत्नागिरी – महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ आणि सुधारणा अध्यादेश, २०२१ अन्वये यावर्षी १ जून ते ३१ जुलै २०२५ (दोन्ही दिवस धरून ६१ दिवस) या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रीय जलधी क्षेत्रात यंत्रचलित आणि यांत्रिक मासेमारी नौकांना मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. बंदी कालावधीत यंत्रचलित आणि यांत्रिकी नौकांद्वारे समुद्रात मासेमारी केली जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन साहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां) सा.वि. कुवेसकर यांनी केले. या बंदी कालावधीत सागरी कायद्याचा भंग करून मासेमारी करणार्‍यांवर कारवाई करण्यात येणार आहे.