पाकने अमृतसरच्या सुवर्ण मंदिराला केले होते लक्ष्य !

भारतीय सैन्याने दिली माहिती

नवी देहली – पाकने पंजाबच्या अमृतसरमधील सुवर्ण मंदिराला लक्ष्य करून क्षेपणास्त्र डागले होते जे भारतीय हवाई संरक्षण दलाने पाडले, अशी माहिती भारतीय सैन्याने दिली. तसेच या पंजाबमध्ये पाडलेल्या क्षेपणास्त्रे आणि ड्रोन यांचे अवशेषही दाखवले.

भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या संदर्भात एक व्हिडिओ प्रसारित करून पाकचा ड्रोन कसा पाडण्यात आला, हे दाखवले. सैन्याने म्हटले की, आम्ही भूमीपासून आकाशापर्यंत रक्षण केले.

संपादकीय भूमिका

खलिस्तानी पाकच्या विरोधात बोलतील का ?