सोहळ्याच्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे मोठे भाऊ पू. अनंत आठवले यांच्या वतीने सूत्रसंचालकांनी व्यक्त केलेले मनोगत पुढीलप्रमाणे –

‘देहाचे वय वाढतच जाते, वाढदिवस येतच राहतात; पण व्यक्तीचा महान संकल्प त्याला आदरणीय आणि त्याच्या वाढदिवसाला स्मरणीय बनवतो. डॉ. आठवले हे केवळ साधना शिकवीत नाहीत, तर ती करवून घेतात. पुढे त्यांच्या कार्याची व्याप्ती वाढली. आज त्यांच्या वाढदिवसाला वरील कार्याबरोबरच त्यांनी विचारांना योग्य वळण देण्यासाठी, जनमानसात भक्ती रुजवण्यासाठी, परंपरागत उच्च संस्कार रुजवण्यासाठी, हिंदुत्व जागृतीसाठी, हिंदूंना संगठित करण्यासाठी आणि धर्मसंस्थापनेसाठी केलेल्या अथक प्रयत्नांचे विशेष स्मरण होत आहे.
भगवान् श्रीकृष्ण म्हणतात –
यद्यद्विभूतिमत्सत्वं श्रीमदूर्जितमेव वा ।
तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजोंशसंभवम् ।।
– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १०, श्लोक ४१
अर्थ – जे जे वैशिष्ट्यपूर्ण, कांतीमान् आणि ऊर्जायुक्त अस्तित्व आहे, ते ते माझ्या तेजाच्या अंशापासून उत्पन्न झाले आहे, असे जाण.
सध्याच्या काळात तसे एक अस्तित्व म्हणजे डॉ. जयंत आठवले ! त्यांचे सर्व संकल्प, विशेषतः धर्मसंस्थापना आणि सनातन राष्ट्र स्थापनेचे संकल्प सिद्धीस जावोत.’
लक्षात घ्या साधनेच्या संदर्भात भारताचे महत्त्व !
अंतर्यामी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांची साधकांवरील प्रीती !
सर्वसाधारण व्यक्ती आणि साधक यांच्या विचारसरणीतील मूलभूत भेद !
रुग्णसेवा मनापासून करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे रत्नागिरी येथील नामवंत वैद्य (कै.) मंदार श्रीकांत भिडे (वय ५१ वर्षे) !
सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी