
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची बहीण अलिमा यांनी सांगितले की त्या कारागृहात त्यांच्या भावाला भेटल्या. तेव्हा इम्रान खान यांनी सांगितले की, पाकने सतर्क रहावे; कारण मोदी नक्कीच सूड घेतील.
काश्मीरप्रश्नी अमेरिकेने हस्तक्षेप करावा !- पाकची विनंती
अमेरिकेतील पाकिस्तानचे राजदूत रिझवान सईद यांनी काश्मीर प्रश्नावर अमेरिकेने हस्तक्षेप करावा, अशी विनंती केली आहे. त्यांनी म्हटले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील युद्धविराम अजूनही नाजूक आहे.
|
पाकिस्तानच्या ‘जमियत उलेमा-ए-इस्लाम-फजल’ पक्षाचे नेते आणि कट्टरपंथी मौलाना फजलुर रहमान यांनी ‘पाकिस्तानकडून झालेल्या पराभवानंतर पंतप्रधान मोदी यांनी त्यागपत्र द्यावे’, असे म्हटले आहे. (या मागणीवर हसावे कि रडावे ? पाकिस्तानी इतके मुर्ख असतील, असेही कुणाला वाटले नसेल ! – संपादक)
नेहमीच पाकिस्तानसमवेत उभे राहू ! – तुर्कीयेचे राष्ट्रपती एर्दाेगान

तुर्कीयेचे राष्ट्रपती रेसेप एर्दोगान यांनी पाकला पुन्हा आश्वस्त केले की, तुर्कीये चांगल्या आणि वाईट काळात पाकिस्तानसमवेत उभा राहील. (पाकिस्तान पाठोपाठ तुर्कीयेला त्याची जागा दाखवण्याची वेळ आली आहे, हेच यातून दिसून येते ! – संपादक)
दुसरीकडे पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पाकला समर्थन दिल्यावरून तुर्कीयेचे आभार मानले आहेत.
भारत आणि पाक यांनी एकमेकांच्या राजनैतिक अधिकार्यांना दिला देश सोडण्याचा आदेश
इस्लामाबाद (पाकिस्तान) येथील भारतीय उच्चायुक्तालयातील एका अधिकार्याला २४ घंट्यात पाकिस्तान सोडण्याचा आदेश दिला. पाकचा आरोप आहे की, हा अधिकारी काही बेकायदेशीर कामात सहभागी होता.
यापूर्वी भारताने नवी देहलीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयातील एका अधिकार्यालाही बेकायदेशीर कारवायांमध्ये सहभागी असल्याचे सांगत २४ घंट्यांच्या आता भारत सोडण्यास सांगितले होते.
संपादकीय भूमिकापाकिस्तानवर अनेक घटनांचा सूड उगवणे प्रलंबित राहिलेले असल्याने तो उगवावा लागणारच आहे आणि हे इम्रान खान यांनाही ठाऊक आहे, ही चांगली गोष्ट आहे ! |
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack on the Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप
ED Investigation : भारतात बांगलादेशी आणि रोहिंग्या यांची घुसखोरी करण्यासाठी विदेशातून अर्थपुरवठा !
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !