सीमेवरील सैनिकांना बळ आणि ऊर्जा मिळावी यांसाठी मारुतिरायाला साकडे

कोल्हापूर – ‘ऑपरेशन सिंदूर’ या भारतीय सैन्याच्या ऐतिहासिक मोहिमेस पाठिंबा देण्यासाठी राजारामपुरी येथील श्री मारुति मंदिरात १० मे या दिवशी मंदिर महासंघाच्या वतीने सामूहिक महाआरती करण्यात आली. ‘भारत सरकारने पाकिस्तानला नकाशावरून उद्ध्वस्त करावे आणि जो कुणी भारताकडे वाकड्या दृष्टीने पाहील त्याला तितक्याच शक्तीने प्रत्युत्तर देता यावे’, असे साकडे श्री मारुतिरायाला घालण्यात आले. या वेळी श्री गणपति आणि मारुति यांची आरती, तसेच हनुमान चालीसा पठण करण्यात आले.
या प्रसंगी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सहसंयोजक श्री. अभिजित पाटील, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, राष्ट्रहित प्रतिष्ठानचे श्री. शरद माळी, हिंदु एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. आनंदराव पवळ, अखिल भारत हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. राजेंद्र तोरस्कर, श्री. मनोहर सोरप, सर्वश्री प्रमोद घोरपडे, राजू सांगावकर, दत्तात्रय गायकवाड, गणपतराव मांडवकर, कमलाकर जगदाळे, किरण साठेगुरुजी यांसह अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि भाविक उपस्थित होते.
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या जतन-संवर्धन कामात भारतीय पुरातत्वीय निकष आणि शास्त्रोक्त संवर्धन पद्धती यांचे काटेकोर पालन व्हावे ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन
हडपसर येथे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याला साहिल शेख आणि त्याच्या टोळीकडून बेदम मारहाण !
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
‘रोटरी क्लब ऑफ हुपरी’च्या वतीने १५० गरजू मुलींना विनामूल्य सायकलवाटप