ब्राह्मोसने केली पाकच्या वायूदल तळांची हानी

नवी देहली – भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकची मोठी हानी केल्याची माहिती आता समोर येत आहे. भारताने पाकची हवाई संरक्षण प्रणाली नष्ट करण्यासह पाकच्या वायूदलाचे ११ तळ उद्ध्वस्त केले आहेत. या कारवाईसाठी भारताने पहिल्यांदाच ब्राह्मोस क्षेपणास्त्रांचा वापर केला आणि त्याचा परिणाम प्रचंड मोठा झाल्याचे संरक्षण तज्ञांकडून सांगितले जात आहे.
🇮🇳💥 “Ask Pakistan About BrahMos’ Power” – CM Yogi Confirms Use in Operation Sindoor!
🛡️ At BrahMos Aerospace Facility launch in Lucknow:
🔹 ₹300 Cr investment
🔹 80–100 missiles/year
🔹 Boost to Atmanirbhar Bharat in defence🔥 Yogi Adityanath showcases India’s missile… pic.twitter.com/S4xDcd8Bvz
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 11, 2025

ब्राह्मोसने पाकच्या वायूदल तळांची प्रचंड हानी केल्याचे व्हिडिओ आता समोर येत आहेत.
ब्राह्मोस क्षेपणास्त्रासह ‘स्कॅल्प’ आणि ‘हॅमर’ यांसारखी हवेतून मारा करणारी अचूक आधुनिक शस्त्रेही वापरण्यात आली. पाकिस्तानचे स्कार्दू, मुरीद, रफीकी, नूर खान, चुनिया, सुक्कुर यांसारखे वायूदल तळ आणि सियालकोट अन् पसरूर येथील रडार तळांची हानी करण्यात आली. ब्राह्मोसची निर्मिती भारत आणि रशिया यांनी संयुक्तरित्या केली आहे. भारताकडून व्हिएतनाम आणि फिलिपाईन्स या देशांनी ब्राह्मोसची खरेदीही केली आहे.
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
बांगलादेशी घुसखोरांचे निर्वासन आणि भारताची सुरक्षा !
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !