|

नागपूर – येथील सर्व पेट्रोल पंपांवर १० मेपासून कोणत्याही प्रकारचे डिजिटल पेमेंट (ऑनलाईन किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केलेले व्यवहार) स्वीकारले जाणार नाहीत, असा निर्णय ‘विदर्भ पेट्रोल डीलर्स असोसिएशन’ने घेतला आहे. सायबर फसवणुकीच्या माध्यमातून मिळवलेला पैसा विविध खात्यांतून फिरून शेवटी पेट्रोल भरण्यासाठी वापरण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या सायबर पथकाने आणि संबंधित बँकांनी पेट्रोल पंप मालकांची बँक खाती गोठवली. सायबर फसवणुकीच्या घटनेशी आमचा कुठलाही संबंध नसतांना आणि ज्या ग्राहकाने आमच्याकडून पेट्रोल भरून डिजिटल पेमेंट केले, त्याचाही सायबर फसवणुकीशी संबंध नाही. विविध बँक खात्यांतून फिरत तो पैसा ग्राहकाकडे आणि नंतर आमच्याकडे आला. अशा स्थितीत आमची खाती गोठवणे अन्यायकारक आहे, असे ‘पेट्रोल डीलर्स असोसिएशन’चे म्हणणे आहे.
‘या संदर्भात लवकर निर्णय न झाल्यास येणार्या काळात संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व पंपांवर ‘डिजिटल पेमेंट’ घेणे बंद करू’, अशी चेतावणी असोसिएशनने दिली आहे. सामान्य ग्राहकांनी ‘डिजिटल पेमेंट’ चालू ठेवावे’, अशी मागणी केली आहे.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या रथास चांदी लावण्याच्या कामास प्रारंभ !
पुण्यातील पाणीटंचाई रोखण्यात महापालिका अपयशी ठरल्याची आयुक्तांची स्वीकृती !
पुणे येथे पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणार्यास १० सहस्र रुपये दंड !
माहिती अधिकाराच्या नव्या नियमांच्या विरोधात आवाज उठवावा ! – अधिवक्ता तुषार झेंडे, जिल्हा ग्राहक परिषद
तुर्भे रेल्वेस्थानकाच्या जवळील पदपथांची दुरवस्था !
‘नीट’च्या फेरपरीक्षेला विलंबाने पोचलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला !