|

नवी देहली – जम्मू-काश्मीरमधील पूंछ क्षेत्रातील गुरुद्वारावर पाकिस्तानने आक्रमण केले. तसेच येथील एका ख्रिस्ती शाळेजवळही तोफगोळे डागले. यात २ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अन्य एका ख्रिस्ती कॉन्व्हेंटवरही आक्रमण करण्यात आले. सुदैवाने शाळा बंद असल्याने तेथील लोक बचावले. पाकने कॉन्व्हेंट शाळा आणि मंदिरे अशा धार्मिक क्षेत्रांना लक्ष्य करून त्याची पत दाखवून दिली आहे, अशी माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी ९ मेच्या सायंकाळी परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेतून दिली.
🇮🇳 India Exposes Pakistan’s True Face! ⚔️
In a sharp media briefing, India’s Foreign Secretary Vikram Misri revealed Pakistan’s targeted attacks on temples and convent schools in Jammu & Kashmir — including a Gurdwara and a Christian school where 2 students lost their lives.
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 9, 2025
मिस्री पुढे म्हणाले की,
१. पाककडून प्रक्षोभक, दायित्वशून्य आणि वाढती आक्रमणे केली जात आहेत. तसेच खोटी माहिती प्रसृत केली जात आहे. ‘भारतीय हवाई दलानेच अमृतसरवर आक्रमण केले’, असा खोटा आरोप करून जगाला चुकीची माहिती दिली जात आहे.
२. भारताने दक्षता म्हणून करतारपूर साहिब कॉरिडोर बंद केला आहे.
३. ७ मेच्या सकाळपासून पाककडून मोठ्या प्रमाणात गोळीबार केला जात आहे.
४. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसमवेत होणार्या बैठकीत भारत त्याची (पाकिस्तानचा चेहरा उघडा पाडणारी) भूमिका मांडणार आहे.
५. परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांनी अमेरिका आणि नॉर्वे येथील परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा केली असून अमेरिकेने आतंकवादाच्या विरुद्धच्या युद्धात तो भारतासमवेत असल्याचे आश्वासन दिले आहे.
पाक मुद्दामहून नागरी विमानतळ बंद न करता त्यांना ढाल बनवत आहे ! – सैन्य
पाकिस्तानकडून सातत्याने नियंत्रण रेषेवर गोळीबार केला जात आहे. यात काही भारतीय सैनिक घायाळ झाले. भारतानेही त्यास चोख प्रत्युत्तर दिले. भारताने पाकच्या ४ हवाई तळांवर आक्रमण केले. पाकने मुद्दामहून नागरी विमानतळ बंद न करता त्यांना ढाल बनवले आहे. भारतीय वायूदल संयत रूपाने पराक्रम गाजवत आहे, अशी माहिती सैन्याच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि भारतीय वायूदलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी पत्रकार परिषदेतून दिली.
संपादकीय भूमिका‘आतंकवादाला धर्म असतो आणि तो इस्लाम आहे’, हे यातून स्पष्ट होते. पाकच्या सैनिकी कारवाईच्या या प्रकारावर आता काँग्रेस आणि कथित धर्मनिरपेक्षतावादी पक्षांना जाब विचारला पाहिजे ! |
चिंचवड (पुणे) येथील श्री मोरया गोसावी मंदिर परिसरातील यात्रेत ‘मेड इन पाकिस्तान’ लेबल असलेल्या चादरीची विक्री !
Andaman Natural Gas :अंदमान ‘शॅलो ऑफशोर ब्लॉक’मध्ये सापडला नैसर्गिक वायूचा दुसरा मोठा साठा
CJI In London: लंडन येथे भारताच्या सरन्यायाधिशांच्या कार्यक्रमात गोंधळ : भारतीय उच्चायुक्तालयाचा तीव्र संताप
Mumbai Hub Of Bangladeshi Infiltrators : मुंबई बांगलादेशी घुसखारांचे केंद्र : १ सहस्र ५०० हून अधिक ठिकाणी घुसखोरांचे अड्डे !
Temple Land Protection Movement : ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ला स्थगिती !
Bhangar Blast : बंगालमधील भांगर बाँबस्फोट प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा माजी आमदार शौकत मोल्ला यास अटक