
मंगळुरू (कर्नाटक) – हिंदु नेते सुहास शेट्टी यांच्या हत्येच्या प्रकरणी ८ जणांना अटक करण्यात आली आहे. अब्दुल सफवान (वय २९ वर्षे), नियाज (वय २८ वर्षे), महंमद मुझम्मील (वय ३२ वर्षे), कलंदर शफी (वय ३१ वर्षे), महंमद रिझवान (वय २८ वर्षे), आदिल मेहरुफ, रणजीत (वय १९ वर्षे) आणि नागराज (वय २० वर्षे), अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपी मंगळुरूमधील बाजपे आणि चिक्कमंगळुरूमधील कलासा शहरातील रहिवासी आहेत. लवकरच आणखी २ संशयितांना अटक होण्याची शक्यता आहे. या हत्येत ६ आरोपींचा थेट सहभाग होता.
Shocking!
📍 Mangaluru, Karnataka: BJP alleges that part of the ₹25 lakh ex-gratia compensation given by Congress Govt to Mohammed Fazil’s family (killed in 2022) was misused to fund Suhas Shetty's murder.
💰 Money meant for justice used for murder ?
🩸 8 arrested (incl. 6… https://t.co/QonJjrVtzo pic.twitter.com/1WHj0DasX8
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 5, 2025
१. यामध्ये अब्दुल सफवान हा मुख्य आरोपी असल्याचे सांगण्यात आले आहे. वर्ष २०२३ मध्ये त्याच्याविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. सफवानवर जीवे मारण्याच्या उद्देशाने आक्रमण केले होते. हे आक्रमण सुहास शेट्टी याने त्याचे सहकारी प्रशांत आणि धनराज यांच्यासह केले होते. या आक्रमणाचा सूड उगवण्यासाठीच सफवानने शेट्टी यांची हत्या करण्याचा कट रचला. त्याने यापूर्वी दोनदा असा प्रयत्न केला होता.
२. पोलीस आयुक्त म्हणाले की, मुख्य आरोपी अब्दुल सफवान याने फाजिलचा भाऊ आदिल मेहरुफ याच्याशी संपर्क साधला. आदिलने सफवानला हत्या करण्यासाठी ५ लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले. ३ लाख रुपयांची आगाऊ रक्कम मिळाल्यानंतर सफवानने आक्रमण करण्यासाठी एक टोळी सिद्ध केली होती.
संपादकीय भूमिकाअशांविरुद्ध लवकरात लवकर खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी हिंदु संघटनांनी कर्नाटकातील काँग्रेस सरकारवर दबाव आणला पाहिजे ! |
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
नागपूर येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीवरील सोन्याची साखळी चोरणार्या ३ धर्मांधांना अटक !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !