हे प्रकरण लव्ह जिहाद असल्याचा पीडितेच्या पालकांचा आरोप

उडुपी (कर्नाटक)- कर्नाटकातील उडुपी येथे ‘लव्ह जिहाद’चे नवीन प्रकरण समोर आले आहे. उडुपीतील करंबळ्ळी येथील रहिवासी असलेल्या महंमद अक्रमने जिना नावाच्या तरुणीचे नुकतेच अपहरण केले. आरोपी मुसलमान तरुण पीडित मुलीशी बलपूर्वक विवाह करण्याच्या प्रयत्नात आहे. हे अपहरण म्हणजे ‘लव्ह जिहाद’चा कट आहे, असा आरोप पीडिती मुलीच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत केला आहे. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
१. कोडवूर, उडुपी येथील गॉडविन देवदास आणि मेरूस पुष्पलता यांची मुलगी जीना महाविद्यालयातून घरी परतत असतांना कुट्टिकट्टे येथे तिला बसमधून खाली उतरवण्यात आले आणि महंमद अक्रमने तिचे अपहरण केले.
२. जीना इयत्ता नववीत शिकत असतांनाच तिची आणि अक्रमची इंस्टाग्रामवर ओळख झाली होती. त्या वेळी अक्रमच्या विरोधात ‘पॉक्सो’ कायद्याखाली गुन्हा नोंदवला गेला होता. तेव्हापासून तो सूड उगवत आहे, असा आरोप पीडित मुलीच्या पालकांनी केला आहे.
३. पोलिसांनी दोघेही प्रौढ असल्याचे सांगून कोणतीही कारवाई न करण्याची भूमिका घेतली, असा पालकांचा आरोप आहे.
४. पोलिसांनी आरोपी तरुणाला कह्यात घ्यावे आणि यामागील मोठे षडयंत्र शोधून काढावे, अशी मागणी पीडित मुलीच्या कुटुंबियांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे.
संपादकीय भूमिकाकर्नाटकमध्ये काँग्रेसचे मुसलमानप्रेमी सरकार असल्याने धर्मांधांचे असे धाडस होते, असे कुणाला वाटल्यास चूक काय ? |