UP Train Derailment Attempt : उत्तरप्रदेशात रेल्वेगाडी उलटवण्याचा प्रयत्न चालकाच्या सतर्कतेमुळे फसला !

दोन अल्पवयीन मुसलमान मुले कह्यात  

हरदोई – उत्तरप्रदेशमध्ये पुन्हा एकदा रेल्वेगाडी उलटवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे उघड झाले. हरदोई रेल्वेस्थानक आणि कौधा रेल्वेस्थानक या दरम्यान समाजकंटकांनी रेल्वेमार्गावर मोठे दगड ठेवून योग नगरी दून एक्सप्रेस उलटवण्याचा प्रयत्न केला; परंतु चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. रेल्वेगाडीच्या चालकाने रूळांवर मोठे दगड पाहून आपत्कालीन ब्रेक दाबले आणि गाडी थांबवली. यानंतर रेल्वे अधिकार्‍यांना माहिती देण्यात आली.

१. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी घटनास्थळावरून कन्हरी गावातील एका १५ वर्षीय मुसलमान युवकाला आणि सहोरा गावातील एका १६ वर्षीय मुसलमान युवकाला कह्यात घेतले आहे. दोघांचीही चौकशी चालू आहे.

२. आरोपी मुले अब्दुलपुरवा गावातील त्यांचा नातेवाईक सलमान याच्या घरी आल्याचे आढळून आले. सलमानच्या घरून ते दोघेही चालत रेल्वेमार्गावर पोचले आणि रूळावर मोठे दगड ठेवले. त्यांनी हे दगड का ठेवले ?, याचे अन्वेषण पोलीस करत आहेत. पोलिसांना या मुलांच्या भ्रमणभाषमध्ये काही छायाचित्रेही सापडली आहेत.

संपादकीय भूमिका

सहस्रो लोकांचे जीव घेण्याइतपत समज असणार्‍यांना ‘अल्पवयीन’ कसे म्हणायचे ? अशांसह त्यांना साहाय्य करणार्‍यांनाही आजन्म कारागृहात डांबले पाहिजे !