
१. ‘श्रीकृष्णाच्या समवेत नृत्य करत आहे’, असा भाव ठेवून चित्र काढल्यामुळे भावाश्रू येणे
‘बालकभावातील चित्रे’ या सनातन निर्मित ग्रंथामध्ये ‘श्रीकृष्णासमवेत नृत्य करणे’, हे चित्र आहे. मी पहिल्यांदा त्या ग्रंथामधील चित्र पहातांना मला ते पुष्कळ सुंदर वाटले. मला चित्र काढण्याची पुष्कळ आवड आहे. चित्र बघितल्यावर मला ‘ते काढावे’, असे वाटले.

श्रीकृष्णाचे चित्र काढतांना माझ्या डोळ्यांतून नकळत अश्रू येत होते आणि ‘मी स्वतः श्रीकृष्णाच्या समवेत नृत्य करत आहे’, असा भाव ठेवून मी ते काढले होते. त्यामुळे चित्र पुष्कळ सुंदर दिसत होते; म्हणून मला वाटले की, ‘श्रीविष्णूचा अवतार रामाचेही चित्र काढावे.’ त्यानंतर मी रामाचेही चित्र काढले. द्वापर आणि त्रेतायुगात श्री विष्णूचे अवतार श्रीराम अन् श्रीकृष्ण यांनी अवतार घेतले होते.
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे चित्र काढण्यापूर्वी प्रार्थना न केल्यामुळे ते काढता न येणे आणि प्रार्थना करून काढल्यावर ते सुंदर येणे
त्याचप्रमाणे या कलियुगात श्रीविष्णूचे अवतार प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी अवतार घेतला आहे. त्यामुळे मी त्यांचे चित्र काढले होते. जेव्हा गुरुदेवांचे चित्र काढत होते, तेव्हा मला चित्र काढता आले नाही. त्या वेळी माझ्या लक्षात आले की, ‘मी प्रार्थना केली नव्हती.’ त्यानंतर मी प्रार्थना करून चित्र काढल्यावर ते सुंदर दिसत होते. यावरून मला हे कळले की, ‘कुठलेही चित्र काढतांना प्रार्थना करून आरंभ करावा, तसेच चित्र काढतांना आपण जितक्या भक्तीभावाने चित्र काढतो, तितकी त्या चित्रामध्ये सात्त्विकता येते.’
मला चित्र काढण्याची कला दिल्याबद्दल सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव यांच्या श्री चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– कु. श्रीविद्या पोगुल, सोलापूर (२५.८.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |