कांदळी (जिल्‍हा पुणे) येथे सनातन संस्‍थेचे श्रद्धास्‍थान प.पू. भक्‍तराज महाराज यांचा प्रकटदिन भक्‍तीमय वातावरणात साजरा !

जुन्‍नर (पुणे), २ फेब्रुवारी (वार्ता.)  सनातन संस्‍थेचे श्रद्धास्‍थान प.पू. भक्‍तराज महाराज यांचा (प.पू. बाबांचा) प्रकटदिन कांदळी, तालुका जुन्‍नर (जिल्‍हा पुणे) येथील आश्रमात प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही भक्‍तीमय वातावरणात साजरा करण्‍यात आला. ‘श्रीरामचंद्र देव ट्रस्‍ट’ आणि ‘प.पू. भक्‍तराज महाराज समाधी ट्रस्‍ट’ यांच्‍या वतीने या दिवशी विविध कार्यक्रम करण्‍यात आले होते. प.पू. बाबांच्‍या समाधीची नित्‍य नैमित्तिक पूजा आणि अभिषेक करण्‍यात आला. प.पू. बाबांचे भक्‍त या कार्यक्रमास मोठ्या संख्‍येने उपस्‍थित होते. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली.