१. भारताची गौरवशाली इतिहासाची परंपरा !
चाणक्य, सम्राट अशोक, राणा प्रताप, राणी लक्ष्मीबाई, छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे हे वीरपुरुष भारतातलेच ! त्यांच्यामुळेच तर भारताचा इतिहास अजरामर झाला आहे.
२. सर्व धर्मांचा आदर करणारा एकमेव देश भारत !
३. भारतानेच सर्वांना विश्वबंधुत्वाची शिकवण दिली !
४. रामायण आणि महाभारत यांसारखे यांसारख्या अद्वितीय महाग्रंथांची निर्मिती याच भारतातील !
५. एकमेवाद्वितीय असे योगशास्त्र आणि आयुर्वेद यांचा निर्माता भारत !
६. भारतीय शास्त्रीय संगीत, नृत्यकला, शिल्पकला भारतातूनच सर्वत्र वृद्धींगत झाल्या !
७. जगातील पहिला शल्यचिकित्सक सुश्रुत हा भारतातील होता.
८. भास्कराचार्य, आर्यभट्ट, वागभट्ट, मिहिराचार्य यांसारखे थोर गणिती आणि खगोलशास्त्रज्ञ यांचा मोठा वारसा भारताला लाभला !
९. ‘०’ ही संकल्पना भारताने जगाला दिली !
१०. जाज्वल्यता आणि बाणेदार असणार्या जिजामातेमुळे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष लाभला ! त्यांचे गोडवे आजही विश्वभरात गायले जातात.
ही केवळ प्रातिनिधीक उदाहरणे आहेत. भारताने विश्वाला काय दिले नाही, असे होऊच शकत नाही; कारण भारताकडून मिळालेल्या देणगीची सूची अमर्याद आणि कधीही न संपणारी अशी अखंड आहे; म्हणूनच तर हा भारत सर्वांसाठी ‘भाग्यविधाता’ ठरत आहे !
– एक राष्ट्राभिमानी नागरिक

समान नागरी कायदा हवा !
श्री विठ्ठलाची श्रेष्ठ भक्ती आणि तीर्थक्षेत्रांचे रक्षण !
संतांचा कार्यकर्त्यांना संदेश
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्रात पुणे येथील शास्त्रीय गायक पंडित डॉ. संजय गरूड यांनी सादर केली गायनसेवा !
‘गूगल मॅप’ आणि ज्योतिषशास्त्र
कुत्र्याला श्रीकृष्णाच्या रूपात दाखवणार्या महिलेला जामीन देतांना हिंदूंच्या भावनांचा अनादर करणारा पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा निवाडा !