देवा, जीर्ण जाहली ही काया ।
कधी येशील रे मजला न्यावया ।।
नित्य तुझे ते नाम मुखी येऊ दे ।
तुझ्या चरणी माझे ध्यान लागू दे ।।
श्री दत्त गुरुराया…।। १ ।।
नको वाटतो हा जीव आता ।
तुझे चरण पहाता प्राण जाऊ दे ।
तुझ्या चरणी मिळू दे विसावा ।
तुझे नाम माझ्या मुखी येऊ दे ।।
श्री दत्त गुरुराया…।। २ ।।
आता ध्यान लागे तुझ्याच चरणी ।
माझ्या हृदयी तुझीच रे छाया ।।
हसत हसत ने मज पैलतिरी ।
विनवी तुझा दास रे हा सुधा ।।
श्री दत्त गुरुराया…।। ३ ।।
– श्री. सुधाकर के. जोशी (वय ९५ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (ऑगस्ट २०२४)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |