पितृपक्षात दत्ताचा नामजप केल्याने पितरांना लवकर गती मिळते; म्हणून त्या काळात प्रतिदिन दत्ताचा न्यूनतम ६ घंटे (७२ माळा) नामजप करावा. दत्ताच्या नामजपाच्या व्यतिरिक्त अन्य वेळी प्रारब्धामुळे त्रास होऊ नये, तसेच आध्यात्मिक उन्नती व्हावी; म्हणून सर्वसामान्य मनुष्याने किंवा प्राथमिक अवस्थेतील साधकाने आपल्या कुलदेवतेचा नामजप अधिकाधिक करावा.