‘जयपूर, राजस्थान येथील संत आणि साधक यांना श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. पू. (श्रीमती) सुशीला मोदी (सनातनच्या ६३ व्या समष्टी संत, वय ७४ वर्षे), जोधपूर, राजस्थान.
१ अ. ‘एकदा आम्ही कुटुंबीय कांचीपूरम् येथे गेलो होतो. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे वास्तव्य कांचीपूरम् येथे असते. मी त्यांच्या निवासस्थानी प्रवेश करत असतांना ‘जणू काही रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आणि साक्षात् वैकुंठात आले आहे’, असे मला वाटले. निवासस्थानी प्रत्येक वस्तूची रचना सात्त्विक होती. सर्व वस्तू योग्य ठिकाणी आणि सर्वांना सहज सापडतील, अशा ठिकाणी ठेवल्या होत्या.
१ आ. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ ईश्वरी गुणांची मूर्ती : श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ मातेच्या वात्सल्याने सर्व साधकांवर प्रेम करतात. प्रेम त्यांच्या अंतरातच आहे. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ ‘सहजता, प्रीती, उत्साह, आपुलकी आणि वात्सल्यभाव’ यांच्या मूर्तीच आहेत. त्या अनेक ईश्वरी गुणांचे भांडार आहेत. त्यांच्या सान्निध्यात राहिल्यावर आम्हाला त्यांच्यातील ईश्वरी गुणांचे दर्शन घडते. त्या नेहमीच पुष्कळ उत्साही असतात. त्या प्रत्येक सेवा परिपूर्ण करतात.
१ इ. इतरांचा विचार करणे : एकदा मी तेथील जिना उतरत असतांना जिन्यातील दिवा लावला नव्हता; कारण खालच्या खोलीतील दिव्याचा प्रकाश जिन्यात येत होता. मी जिन्याची एक पायरी उतरताच श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ स्वतः खोलीतून बाहेर आल्या आणि त्यांनी जिन्यातील दिवा लावला. ‘त्या सतत इतरांचा विचार करतात’, असे मला दिसून आले.
१ ई. स्वतःला विसरून गुरुकार्यात समर्पित होणे : श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ जोधपूर येथे आमच्या घरी आल्यावर स्वतःच्या घरात आल्याप्रमाणे त्या सर्व कामांत सहभागी होतात. एकदा मी त्यांना सांगितले, ‘‘तुम्ही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी आहात.’’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘सद्गुरु, उत्तराधिकारी, असे काही नाही. प्रथम आपल्याला या सेवाकेंद्राची आणि अन्य सेवांची घडी बसवायची आहे. प्रत्येक सेवाकेंद्र वैकुंठासमान व्हायला हवे.’’ त्या सर्व गुरुकार्र्यांत समर्पित होतात.
२. सौ. स्वाती मोदी, जोधपूर, राजस्थान.
अ. ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा वाढदिवस मार्गशीर्ष पौर्णिमा, म्हणजेच दत्तजयंतीच्या दिवशी असतो. मला त्यांच्यामध्ये नेहमी दत्तात्रय देवतेचे दर्शन होत असते.
आ. त्या माझ्यावर करत असलेल्या प्रीतीमुळे माझी सर्व दुःखे नाहीशी होतात. माझ्यावर एखादे संकट आल्यास मी त्यांना शरण जाते. तेव्हा माझी सर्व दुःखे नाहीशी होतात.’
३. सौ. राखी मोदी (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ४३ वर्षे), जोधपूर, राजस्थान.
३ अ. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ ईश्वरासम भासणे : ‘ईश्वर आपल्या भक्तांचे त्रास स्वतःवर घेतो. ईश्वराला आपल्या मनातील गोष्ट, सुख-दुःख सांगितल्यानंतर आपले मन पूर्णतः शांत होते. ईश्वर सदैव आनंदात रहातो. माझा ईश्वर श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ आहेत. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना पाहिल्यावर आणि त्यांचे बोलणे ऐकल्यावर माझे मन प्रफुल्लित होते. त्यांच्या मुखातून निघालेले प्रत्येक वाक्य परम सत्य असते.
३ आ. काटकसरी : श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ स्वतःजवळ आवश्यक तेवढ्याच वस्तू ठेवतात आणि वस्तू सांभाळून वापरतात.
४. श्री. शैलेश मोदी, जोधपूर, राजस्थान.
अ. ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आम्हाला ‘नेहमी आनंदी कसे रहायचे ? वर्तमानकाळात कसे रहायचे ?’, याविषयी सांगतात. त्या आम्हाला प्रत्येक परिस्थिती शांत आणि हसतमुख राहून स्वीकारायला सांगतात.’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : १.१२.२०२४)