‘विश्वकल्याणासाठी अविरत कसे झटायचे ?’, याचे मूर्तीमंत उदाहरण असलेल्या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !

(डावीकडून) श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (वर्ष २०१९)

१. प्रीती

‘प्रीती’ हा ईश्वराचा स्थायीभाव आहे. आई जगदंबिका करुणावत्सल आहे. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळही तशाच आहेत. त्यांच्या प्रीतीची व्यापकता केवळ साधकांपुरती मर्यादित नसून ‘सार्‍या विश्वाला प्रेम कसे देता येईल ?’, असा त्यांचा विचार असतो.

२. सहजतेचे मूर्तीमंत रूप !

‘२४ घंटे अध्यात्म कसे जगायचे ?’, याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ ! त्या प्रत्येक गोष्टीचे अध्यात्मीकरण करतात. प्रत्येक कृतीला श्री गुरु किंवा ईश्वर यांच्याशी जोडून त्यातून सहजसोपे अध्यात्म साधतात. त्यांच्या सहज बोलण्यातूनही ज्ञान आणि भक्ती यांचा अमृतरस स्रवतो. श्री गुरूंची ज्ञानशक्ती त्यांच्या माध्यमातून कार्यरत झाली आहे. त्यांची अमृतवाणी ऐकणार्‍या साधकांचे साधनेचे दृष्टीकोन पक्के होतात. त्यांच्या बोलण्यातून साधकांना केवळ साधनेचेच नाही, तर जगण्याचेही मर्म समजते. त्यांच्यामुळे साधकांना कळते की, आपण ज्याला कठीण समजत होतो, ती साधना आणि अध्यात्म किती सोपे आहे !

३. शारीरिक यातना झेलूनही विश्वकल्याणासाठी अविश्रांत प्रवास !

सप्तर्षी सांगतात, ‘खरेतर असा प्रवास करणे शक्य नाही; पण कार्तिकपुत्री (सप्तर्षी श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना ‘कार्तिकपुत्री’ असे संबोधतात.) एक स्त्री असूनही हा प्रवास करत आहे.’ संत तुकाराम महाराज यांच्या ‘ज्याचे अंगी मोठेपण । तया यातना कठीण ।।’ या उक्तीप्रमाणे श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना अनेक शारीरिक त्रास होतात. या शारीरिक यातना झेलून त्या अविरत आणि अविश्रांतपणे दैवी प्रवास करत आहेत.

देहबुद्धी नष्ट झाल्याने त्या देहाची सारी बंधने तोडून देह मर्यादांच्या पलीकडे गेल्या आहेत. एखादी आई जशी स्वतःचे सारे दुःख-कष्ट दूर सारून स्वत:च्या लेकरांसाठी झटत असते, त्याप्रमाणे श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ आपल्या विश्वकुटुंबासाठी आणि विश्वकुटुंबातील सर्व लेकरांसाठी अविरत झटत आहेत. त्यामुळेच अत्यल्प कालावधीत त्या ‘श्रीचित्‌शक्ति’ आणि ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी’ या टप्प्यांपर्यंत पोचल्या आहेत.

४. महर्षींचे आज्ञापालन, हेच श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे जीवन !

प्रत्येक क्षण वर्तमानात राहून महर्षींच्या आज्ञेनुसार त्या विश्वकल्याणासाठी झटत आहेत. याला कशाचीच तोड नाही. त्यांच्या स्थुलातील कार्यासमवेत सूक्ष्मातील कार्याचा आवाकाही प्रचंड आहे. त्यांचा त्याग आणि त्यांचे कार्य यांना कोणतीच उपमा देणे शक्य नाही.

५. आपत्काळापूर्वी दुर्मिळ वस्तूंचे जतन करण्याचे कठीण कार्य करण्यासाठी भगवंताने श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांची निवड करणे

सत्ययुगात महाप्रलयाच्या वेळी भगवान श्रीविष्णूने ‘मत्स्यावतार’ घेऊन सप्तर्षींच्या माध्यमातून समस्त सृष्टीतील प्रत्येक घटकाची बिजे एकत्रित करून त्यांचे रक्षण केले होते. आता या कलियुगात श्रीविष्णूचा ‘जयंतावतार’ चालू आहे. या वेळीही आपत्काळापूर्वी सप्तर्षींच्या आज्ञेनुसार श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांचा दैवी प्रवास चालू असून देशविदेशांतील अनेक तीर्थक्षेत्रांतील दुर्मिळ वस्तूंचे त्या जतन करत आहेत. या विशाल कार्यासाठी श्रीविष्णूची चैतन्यशक्तीच समर्थ असल्याने भगवंताने श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांची निवड केली आहे. त्यांच्यासारखे कार्य कुणीच करू शकणार नाही; म्हणूनच सप्तर्षींनी त्यांना ‘श्रीदेवी’ म्हणून गौरवले, यात नवल ते काय !

त्यांच्यातील हे दिव्यत्व अनुभवतांना म्हणावे वाटते, ‘दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती ।’

श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्यात कार्यरत असलेल्या अवतारी तत्त्वाचा लाभ सर्वत्रच्या साधकांना निरंतर व्हावा, अशी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यातील अवतारी देवीतत्त्वाला आम्हा सर्वांचे कोटी कोटी कृतज्ञतापूर्वक वंदन !’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.