
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : ‘मी गेली २५ ते ३० वर्षे अध्यात्माचा अभ्यास केला. त्याचे महत्त्व मला आता लक्षात आले. या अभ्यासामुळे मला सूश्री मधुरा भोसले, श्री. निषाद देशमुख आणि श्री. राम होनप या साधकांना सूक्ष्मातून मिळणार्या ज्ञानातील माहिती समजते.
मी सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना अध्यात्मातील विविध प्रश्न विचारतो. ते साधक त्या प्रश्नांची उत्तरे त्यांना सूक्ष्मातून मिळालेल्या ज्ञानाद्वारे देतात. ‘ही उत्तरे मला समजावीत’, यासाठी देवाने माझा अध्यात्माचा अभ्यास आधीच करवून घेतला का ?’

१. ज्ञानातील अपूर्णता दूर करता येणे
सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळणारे सूक्ष्मातील ज्ञान कधीकधी त्रोटक स्वरूपात किंवा अपूर्ण असते. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचा पूर्वी अध्यात्माचा सखोल अभ्यास झाला असल्याने त्यांना ते सहजतेने समजते. तेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळालेल्या अपूर्ण ज्ञानासंबंधी उपप्रश्न विचारतात. त्याचे उत्तर सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक सूक्ष्मातील ज्ञानाद्वारे मिळवतात. त्यामुळे तो विषय परिपूर्ण होतो.
२. ज्ञानातील त्रुटी दूर करता येणे
सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना सूक्ष्मातील ज्ञान मिळवण्यात आणि ते मांडण्यात काही मर्यादा आहेत. त्यामुळे अशा ज्ञानात काही त्रुटी रहातात. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना अध्यात्मातील मूलभूत सिद्धांत ठाऊक असल्याने त्यांना ज्ञानातील त्रुटी सहजतेने लक्षात येतात. त्यामुळे ते त्या त्रुटी दूर करतात.
३. ज्ञानात वाईट शक्ती करत असलेला हस्तक्षेप ओळखता येऊन तो दूर करता येणे
‘सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना सूक्ष्मातून मिळणार्या ज्ञानाद्वारे जिज्ञासू आणि साधक यांच्या मनातील अध्यात्मातील शंकांचे निरसन होऊन त्यांची साधना आणखी चांगली होणार आहे’, याचे ज्ञान वाईट शक्तींना असते. त्यामुळे वाईट शक्ती सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांवर सूक्ष्मातून आक्रमणे करून साधकांना सूक्ष्मातून मिळालेल्या ज्ञानात मधेच चुकीची माहिती मिसळतात आणि समष्टीची हानी करण्याचा प्रयत्न करतात. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर यांचा असलेला अध्यात्माचा अभ्यास आणि त्यांची सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता’, यांमुळे ते चुकीचे ज्ञान वेळीच ओळखून ते अयोग्य ज्ञान दूर करतात. परिणामी समष्टीपर्यंत अचूक ज्ञान पोचते. यातून सनातन धर्माची हानी न होता तो वाढीस लागण्याचे कार्य घडते.
४. ज्ञानातील भिन्न विचारसरणींकडे अभ्यासाच्या दृष्टीने पहाता येणे
सनातन धर्मात एकाच विषयावर अनेक विचारसरणी किंवा पाठभेद आहेत. ‘ईश्वराकडून ज्ञान मिळवणार्या साधकाची प्रकृती, त्याची साधना आणि योगमार्ग, त्याचा एखाद्या विषयाकडे पहाण्याचा दृष्टीकोन आणि त्या वेळची परिस्थिती’, यांमुळे अध्यात्मात एका विषयाची किंवा एका प्रश्नाची भिन्न उत्तरे असू शकतात. असे असले, तरीही सनातन धर्माने ज्ञानातील भिन्न विचारसरणींचा आदर आणि स्वीकार केला आहे. या अंगानेही सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी अध्यात्माचा अभ्यास केला आहे. त्यामुळे सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना एकाच प्रश्नावर सूक्ष्म ज्ञानाद्वारे भिन्न उत्तरे मिळाली, तरीही सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी त्यांचा स्वीकार करून त्यांकडे अभ्यासाच्या दृष्टीने पाहिले.
५. नाविन्यपूर्ण ज्ञानाचा सहजतेने स्वीकार करता येणे
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी अध्यात्माचा दीर्घकाळ आणि सर्वांगांनी अभ्यास केला आहे. याद्वारे त्यांनी ‘सनातन धर्माचे स्वरूप आणि व्याप्ती, ज्ञानातील भिन्न विचारसरणी अन् असंख्य पैलू’ समजून घेतले. पुढे गुरुकृपेमुळे सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना सूक्ष्मातील ज्ञानाद्वारे अध्यात्मातील नवनवीन पैलू समजू लागले. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी पूर्वी केलेल्या अध्यात्माच्या अभ्यासामुळे त्यांनी या नाविन्यपूर्ण ज्ञानाचा सहजतेने स्वीकार केला.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्ते साधक), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : ९.१.२०२६, वेळ : सकाळी १०.३० आणि कालावधी : २० सेकंद)
गुरूंचे श्रेष्ठत्व !
भावाच्या स्तरावर प्रयत्न करून भावानंद अनुभवणार्या ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सनातनच्या सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका सुश्री मधुरा भोसले (वय ४३ वर्षे) !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
‘जेथे जातो तेथे तू (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) माझा सांगाती ।’ या वचनाची साधिकेला आलेली प्रचीती !
सद्गुरु नंदकुमार जाधव (वय ७४ वर्षे) यांची साधकाने अनुभवलेली प्रीती !
अंतत: ईश्वरी कायदे आणि जमाखर्च हेच महत्त्वाचे !