(म्हणे) ‘देशात मशिदी आणि दर्गे यांच्या विरोधात खटले प्रविष्ट (दाखल) होणे चुकीचे !’ – Former Justice Rohinton Nariman

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रोहिंटन नरिमन यांचे हिंदुद्वेषी विधान !

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रोहिंटन नरिमन

नवी देहली – आज आपण पहात आहोत की, संपूर्ण देशात मशिदी आणि दर्गे यांच्या विरोधात खटले प्रविष्ट (दाखल) केले जात आहेत. माझ्या मते, याचा प्रतिकार करण्याचा एकमेव मार्ग बाबरीचा निकाल आहे, ज्यात पूजा स्थळ कायद्याचे (प्लेसेस ऑफ वर्शिप अ‍ॅक्टचे) समर्थन करण्यात आले आहे. त्यामुळे बाबरी खटल्याच्या निकालात प्रत्येक जिल्हा आणि उच्च न्यायालय यांच्यासमोर वाचायला हवा; कारण त्या निकालातील ५ पाने सर्वोच्च न्यायालयाच्या कायद्याची घोषणा आहे. जी सर्वांसाठी बंधनकारक आहे. या निकालात सांगितल्याप्रमाणे जर पूजा स्थळ कायदा लागू झाला, तर हे प्रकार सहजपणे थांबतील, असे विधान सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रोहिंटन नरिमन यांनी यांनी केले. ते अहमदी फाऊंडेशनकडून आयोजित ‘धर्मनिरपेक्षता आणि भारतीय संविधान’ या विषयावरील व्याख्यानात बोलत होते.

संपादकीय भूमिका

भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांतर्गत हिंदूंकडून हे खटले प्रविष्ट केले जात आहेत. तरीही यावर एका माजी न्यायमूर्तींनी असे विधान करणे हिंदूंना अचंबित करणारे आहे !