रामनाथी आश्रमातील वैद्या (कु.) अपर्णा महांगडे यांच्‍याकडून उपचार घेतांना लक्षात आलेली सूत्रे !

‘१८.८.२०२४ या दिवशी मला होणार्‍या उष्‍णतेच्‍या त्रासावर उपचार घेण्‍यासाठी मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमातील वैद्या (कु.) अपर्णा महांगडे यांच्‍याकडे गेलो होतो. तेव्‍हा मला काही सूत्रे शिकायला मिळाली. ती सूत्रे, तसेच इतर वेळी समाजातील काही आधुनिक वैद्यांकडून उपचार घेतांना लक्षात आलेली सूत्रे येथे दिली आहेत.

वैद्या (कु.) अपर्णा महांगडे

वैद्या (कु.) अपर्णा महांगडे यांनी तपासणी करतांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

१. वैद्या (कु.) अपर्णा महांगडे रुग्‍ण तपासणीसाठी बसलेल्‍या चिकित्‍सालयात प्रवेश केल्‍यावर मला तिथे ‘शांतता आणि स्‍थिरता’ जाणवली. ‘माझे आजार कोणकोणते आहेत ? आणि ते कसे सांगू ?’, असा संकोच मला वाटला नाही.

२. अपर्णाताईंनी प्रथम माझी आपुलकीने विचारपूस केली. नंतर आम्‍ही दोघांनीही भगवंताला प्रार्थना केली. प्रार्थना करतांना डोळे बंद केल्‍यावर ‘साक्षात धन्‍वन्‍तरि देवता अपर्णाताईंच्‍या मागे उभी आहे’, असे मला जाणवले.

श्री. मिनेश पुजारे

३. त्‍यांनी तपासणी करतांना माझे नाडीपरीक्षण केले. ‘मला कोणते आजार किंवा त्रास आहेत ?’, ते विचारले. मला काही मासांपूर्वी कावीळ झाली होती आणि ताप येत होता, त्‍याविषयी त्‍यांनी मला स्‍वत:हून अचूकपणे सांगितले. माझ्‍या शरिरात ताप मुरलेला आहे आणि त्‍यामुळे मला जो त्रास होतो, त्‍याची लक्षणेही अचूकपणे त्‍यांनी मला सांगितली.

४. ‘साक्षात धन्‍वन्‍तरि देवताच मला तपासून उपचार करत आहे’, असे मला जाणवले. ताईंनी अगदी ५ मिनिटांच्‍या तपासणीमधून निदान सांगितले.

५. ‘साधना करत असलेले साधक वैद्य ‘साधक आणि समाजातील लोक यांना होणारा त्रास दूर करून त्‍यांची साधना चांगली व्‍हावी’, यासाठी उपचार करतात’, असे मला शिकायला मिळाले.

‘यावरून प्रत्‍येक कृतीला आपण साधनेची जोड दिली, तर देवाचे साहाय्‍य मिळून ती कृती परिपूर्ण होते’, हे मला शिकायला मिळाले. आध्‍यात्मिक स्‍तरावर साधना म्‍हणून साधकांची तपासणी करणारे साधक वैद्य गुरुदेवांनी दिले आहेत, यासाठी त्‍यांच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त करतो.’

– श्री. मिनेश पुजारे, सोलापूर (१९.८.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक