नवी देहली – केंद्र सरकारने महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनक्षेत्राला चालना देण्यासाठी विशेष साहाय्य योजनेंतर्गत अंडर वॉटर म्युझियम (पाण्याखालील संग्रहालय), आर्टिफिशियल रिफ (सागरी जीवसृष्टीला चालना देण्यासाठी मानवनिर्मित रचना) आणि पाणबुडी पर्यटन यांसाठी ४६ कोटी ९१ लाख रुपयांचा निधी संमत केला आहे. तसेच नाशिक येथील आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदाघाट परिसरात ‘राम काल पथ’ उभारण्यासाठी ९९ कोटी १४ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य संमत केले आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत याविषयीची घोषणा केली आहे.