सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या खोलीत बसून नामजप करतांना श्री. विनायक आगवेकर यांना आलेल्या विविध अनुभूती

‘एकदा मला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या खोलीत दुपारी ३.३० ते ४ या वेळेत ‘हरे राम हरे राम राम राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।।’ हा जप करण्याची संधी मिळाली. ‘हा जप करण्यापूर्वी मी देह शुद्ध करून त्यांच्या खोलीत गेलो, तर त्याचा मला अधिक लाभ होईल’, असा विचार करून मी ध्यानमंदिरात बसून माझ्याभोवती आलेले अनिष्ट शक्तीचे आवरण काढले आणि काही वेळ जप केला. त्यानंतर सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या खोलीत बसून नामजप करतांना मला पुढील अनुभूती आल्या. 

श्री. विनायक आगवेकर

१. खोलीत गेल्यावर मला पुष्कळ हलकेपणा जाणवला.

२. जपाला प्रारंभ केल्यावर वातावरणात सनातन-निर्मित श्रीरामाच्या सात्त्विक चित्रातील रंगाप्रमाणे निळा रंग दिसू लागला.

३. मला सूक्ष्मातून सर्वत्र मोरपिसे दिसत होती.

४. काही वेळाने खोलीत सूक्ष्मातून भगवान श्रीरामाचा बाण आणि श्रीकृष्णाचे सुदर्शन चक्र फिरतांना दिसू लागले.

५. जपाच्या प्रारंभी मला ‘श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचे तारक रूप कार्यरत होते’, असे जाणवले. काही वेळानंतर मला त्यांचे मारक रूप कार्यरत झाल्याचे जाणवले.’

– श्री. विनायक आगवेकर (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ४७ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक