Rajasthan Cow Smugglers Encounter : भरतपूर (राजस्थान) येथे पोलिसांची गोतस्करांसमवेत चकमक !

१०० गायी जप्त

भरतपूर (राजस्थान) – येथील चौकी तलाव परिसरात ३ नोव्हेंबरच्या रात्री पोलीस आणि गोतस्कर यांच्यात झालेल्या चकमकीनंतर गोतस्कर ट्रक सोडून पळून गेले. या ट्रकमध्ये ३० गायी सापडल्या. या गायींना हरियाणातील नूंह येथे कत्तलीसाठी नेण्यात येत होते.

गोरक्षक दलाच्या सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रक आला असता पोलिसांनी तो थांबवण्याचा प्रयत्न केला. यावर ट्रकचालकाने पोलिसांवर गोळ्या झाडण्यास चालू केले. त्याला पोलिसांनीही प्रत्युत्तर दिले. यानंतर तस्करांनी ट्रक सोडून पळ काढला. पोलिसांनी त्यांचा शोध घेतला मात्र ते सापडले नाही; मात्र त्यांना आणखी १०० गायी सापडल्या. सर्व गायी जप्त करून बायणा येथील रुदवल श्रीकृष्ण गोशाळेत आणि भरतपूरच्या इक्रान गोशाळेत पाठवण्यात आल्या.

संपादकीय भूमिका

गोतस्करांचे पोलिसांवर गोळीबार करण्याचे धाडस होते, यातून त्यांची किती सिद्धता असते, हे लक्षात येते. अशांना आता फाशीचीच शिक्षा करण्याचा कायदा करण्याची आवश्यकता आहे !