बारामती (जिल्हा पुणे) – वक्फ बोर्डाविषयी ज्या समाजाचा प्रश्न आहे, त्या समाजाचे ऐकल्याविना आम्ही वक्फ बोर्डाच्या कायद्यामध्ये पालट करू देणार नाही. तुम्ही त्या समाजाला विचारा. मानसन्मान करा. वक्फ बोर्डाच्या वेळी मतदान झाले. तेव्हा या राज्यातील किती पक्षांनी मतदान केले ? याचेही उत्तर त्यांना द्यावे लागेल. ज्यांना सोयीचे होते, ते तेथून गायब झाले, असे चालणार नाही. हो किंवा नाही, असे उत्तर द्यावे लागेल, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांचे नाव न घेता केली. बारामती येथे ‘कार्यकर्ता संवाद मेळाव्या’मध्ये त्या बोलत होत्या. वक्फ बोर्डावरून मला ‘ट्रोल’ केले जाते. काय बोलायचे ते बोला, मला काही फरक पडत नाही, असेही त्या शेवटी म्हणाल्या.