१. एक खोली पहातांना ‘ती एका मोठ्या संतांची खोली असणार’, असे वाटणे आणि ‘ती प.पू. गुरुदेवांनी पूर्वी निवास केलेली खोली आहे’, असे कळल्यावर भाव जागृत होणे
‘मिरज आश्रमात प्रवेश केल्यावर मला ‘हा आश्रम पहायला मिळत आहे’, याचा आनंद होत होता. त्या वेळी मी पायर्या उतरत असतांना समोर एका खोलीचे दार उघडे होते. त्या खोलीत एक पलंग, एक आसंदी आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र होते. त्या खोलीकडे पाहून ‘खोली सुंदर आणि चैतन्यमय आहे. कदाचित् ही खोली मोठ्या संतांची असणार’, असा विचार माझ्या मनात आला. तेथील ‘या खोलीत प.पू. गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) पूर्वी वास्तव्य केले आहे’, अशी पाटी वाचल्यावर माझा भाव जागृत झाला.
२. ध्यानमंदिरात गेल्यावर श्री गुरूंच्या व्यापक रूपाची प्रचीती येणे
मी आश्रमातील ध्यानमंदिरात गेलो. तेव्हा ‘श्री गुरु किती विशाल आणि व्यापक आहेत ! ते सर्वत्र आहेत. त्यांनी किती विशाल आश्रम निर्माण केले आहेत ! ते सर्वच आश्रमांत सूक्ष्मातून उपस्थित असतात. सर्व आश्रमांतील साधक एकसारखे असून केवळ त्यांची रूपे भिन्न आहेत’, असे विचार मनात येऊन मला कृतज्ञता वाटू लागली.
३. सद्गुरु अनुराधा वाडेकर यांना श्री दुर्गादेवीने सूक्ष्मातून दर्शन दिलेली खोली आणि देवीचे चित्र पाहिल्यावर पुष्कळ कृतज्ञता वाटणे
आश्रमातील सर्वांत वरच्या माळ्यावरील एका खोलीत सद्गुरु अनुराधा वाडेकर यांना श्री दुर्गादेवीने सूक्ष्मातून दर्शन दिले होते. ती खोली आणि त्या खोलीतील श्री दुर्गादेवीचे चित्र पहातांना ‘आपल्याला नवरात्रीच्या कालावधीत हे चित्र पहायला मिळत आहे’, असे वाटून माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली.
‘कलियुगातील रज-तमयुक्त वातावरणातही गुरुदेवांनी साधकांना साधना करण्यासाठी सात्त्विक, सुंदर आणि चैतन्यमय आश्रम निर्माण केले आहेत’, याविषयी मला कृतज्ञता वाटली आणि ‘आपणही पुष्कळ साधना करावी’, असे मला वाटले. ‘गुरुदेवांच्या कृपेमुळे मला शिकण्याची संधी मिळाली’, त्याबद्दल श्री गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. वेदांत अरुण सोनार, जळगाव (८.१०.२०२४)
|