तेल अविव (इस्रायल) – लेबनॉनमधील जिहादी आतंकवादी संघटना ‘हिजबुल्ला’चा संभाव्य उत्तराधिकारी हाशेम सफीद्दीन इस्रायलने केलेल्या हवाई आक्रामणात ठार झाला. या वृत्ताला हिजबुल्लाने अद्याप दुजोरा दिलेला नाही.
Israeli Military Confirms Top #Hezbollah Leader Hashem Safieddine’s Death, successor to Hassan Nasrallah#IsraelHezbollahwar #MiddleEast pic.twitter.com/RcQDmxJRyN
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 23, 2024
४ ऑक्टोबरला बेरूतच्या दक्षिण भागात झालेल्या आक्रमणात हाशेम सफीद्दीन मारला गेला. या वेळी हिजबुल्लाचे आणखी २५ नेते मारले गेले. इस्रायलच्या सैन्याने १९ दिवसांनी हाशेमच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. इस्रायलच्या सैन्याने सांगितले की, हिजबुल्लाच्या गुप्तचर शाखेचा प्रमुख असलेला हाशेम सफीद्दीन आणि अली हुसेन हाझिमा हे ३ आठवड्यांपूर्वी दहियाह उपनगरात झालेल्या आक्रमणात ठार झाले होते.