सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संत आणि अवतार यांच्या कार्यांविषयीच्या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे लिखाण 

संत आणि गुरु व्यष्टीचे प्रारब्ध पालटू शकतात, तर अवतार समष्टीचे प्रारब्ध पालटू शकतात. (पौष कृ. १, कलियुग वर्ष ५१११ (१.१.२०१०))

२. वरील लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण 

श्री. राम होनप

२ अ. गुरूंचे कार्य : ‘शिष्याला टप्प्याटप्प्याने घडवून मोक्षाचा मार्ग दाखवणे’, हे गुरूंचे कार्य असते.

२ अ १. शिष्याला साधना शिकवणे : गुरु शिष्याला साधना शिकवतात आणि त्याच्याकडून टप्प्याटप्प्याने तन-मन-धन यांचा त्याग करून घेतात.

२ अ २. साधनेतील अडचणी दूर करून शिष्याची आध्यात्मिक प्रगती करून घेणे : साधना करतांना शिष्याच्या जीवनात अनेक अडचणी येतात. गुरु अशा शिष्याला वेळोवेळी मार्गदर्शन करून त्याला अडचणींतून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतात. गुरूंनी केलेल्या मार्गदर्शनानुसार शिष्याने नियमित साधना केल्यास शिष्याची शीघ्र आध्यात्मिक प्रगती होते.

२ अ ३. गुरूंमुळे शिष्याच्या प्रारब्धात पालट होणे : गुरूंनी केलेल्या मार्गदर्शनानुसार शिष्य तन-मन-धन यांचा त्याग करू लागतो. त्यामुळे त्याच्या अनेक जन्मांचे प्रारब्ध न्यून होते. असा शिष्य जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होतो. अशा प्रकारे गुरु शिष्याच्या प्रारब्धात पालट करतात.

२ अ ४. गुरूंचे कार्य शिष्यांपुरते मर्यादित असणे : बहुतेक गुरूंचे एखादा शिष्य किंवा ठराविक शिष्य यांच्यापुरते कार्य मर्यादित असते. हे कार्य पूर्ण झाले की, असे गुरु देहत्याग करतात.

२ आ. अवतारांचे कार्य : आतापर्यंत श्रीराम, श्रीकृष्ण या अवतारांनी पृथ्वीवर जन्म घेऊन ‘भक्तांचे कल्याण करणे आणि धर्मकार्यातील अडथळे दूर करून धर्मसंस्थापना करणे’, हे कार्य केले आहे. अवतारांचे कार्य व्यापक स्वरूपात असते. सध्याच्या काळात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अवतारी कार्याविषयी पुढे दिले आहे.

२ आ १. अनेक साधकांची आध्यात्मिक प्रगती करून घेणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी जिज्ञासूंना सहजतेने समजेल अशा भाषेत अध्यात्मशास्त्र समजावून सांगितले. त्यामुळे जिज्ञासू टप्प्याटप्प्याने तन-मन-धन यांचा त्याग करून साधक बनले. त्यांपैकी अनेक साधकांनी शीघ्र आध्यात्मिक प्रगती साध्य करून संतपद प्राप्त केले. एरव्ही गुरु एखाद्या शिष्याला संतपदापर्यंत पोचवतात. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे अवतारी कार्य असल्याने आतापर्यंत त्यांनी अनेक साधकांना संतपदापर्यंत पोचवले. ही घटना कलियुगात दुर्मिळ आहे.

२ आ २. साधकांचे रक्षण करणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली अनेक साधक राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करत आहेत. त्यामुळे वाईट शक्ती सूक्ष्मातून साधकांवर आक्रमणे करतात. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या देहाद्वारे प्रक्षेपित होत असलेल्या चैतन्यामुळे त्या वाईट शक्तींचा जोर न्यून होतो. परिणामी साधकांचे रक्षण होऊन त्यांच्या साधनेतील अडथळे न्यून होतात.

२ आ ३. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा संकल्प करून राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांना जागृत करणे : सध्या सनातन धर्म रसातळाला गेला आहे. ‘धर्माची पुनर्स्थापना व्हावी’, यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा संकल्प केला आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी अनेक जणांतील राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम जागृत करून त्यांना हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी करावयाच्या प्रयत्नांची दिशा दिली आहे.

२ आ ४. वाईट शक्तींशी सूक्ष्मातील लढा : हिंदु राष्ट्राच्या स्थापनेत सर्वांत मोठा अडथळा सप्तपाताळांतील वाईट शक्तींचा असतो; कारण हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्यास समाज धर्माचरण करू लागेल आणि वाईट शक्तींच्या अधर्म पसरवण्याच्या कार्याला प्रतिबंध होईल. असे होऊ नये, यासाठी वाईट शक्ती वर्ष २००१ पासून ते आतापर्यंत प्रथम सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आणि त्यानंतर साधक यांवर सूक्ष्मातून आक्रमणे करत आहेत. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे अवतारी कार्य असल्याने त्या वाईट शक्तींची सूक्ष्मातील आक्रमणे निष्प्रभ ठरतात. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या देहाद्वारे प्रक्षेपित होत असलेल्या चैतन्यामुळे वाईट शक्तींचा जोर न्यून होतो. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर अवतार असल्याने त्यांना मोठ्या वाईट शक्तींशी दीर्घकाळ सूक्ष्मातून लढणे शक्य आहे.

२ आ ५. अस्तित्वाने काळात पालट घडवणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर ईश्वरस्वरूप आहेत. त्यांच्या अस्तित्वाने साधकांना साधना करण्यासाठी शक्ती मिळते आणि वातावरणातील रज-तम न्यून होते. त्यामुळे सनातन धर्माचे कार्य टिकून आहे. अशा प्रकारे ते काळात परिवर्तन करत आहेत.

२ आ ६. सनातन धर्मातील अडथळे दूर करून धर्माची पुर्नस्थापना करणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी समाजात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची बिजे रोवली आहेत. कालांतराने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या रूपात त्याचा वटवृक्ष होणार आहे.

२ आ ७. अवतारी कार्यामुळे समष्टीच्या प्रारब्धात पालट होणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या संकल्पामुळे पुढे हिंदु राष्ट्राची स्थापना होऊन धर्मसंस्थापना होणार आहे. तसे झाल्यावर समाजातील वातावरण रज-तमयुक्त न रहाता सात्त्विक असणार आहे. त्यामुळे सात्त्विक जिवांना ‘जीवन जगणे आणि आध्यात्मिक प्रगती साध्य करणे’, हे सुलभ होणार आहे. अशा प्रकारे काळात सकारात्मक पालट झाल्याने समष्टीचे प्रारब्धही चांगले होते.

२ इ. संत आणि अवतार यांचे कार्य : संत आणि अवतार या दोन्हींचे कार्य ईश्वरी असते; परंतु त्या कार्याचे स्वरूप आणि व्याप्ती ही भिन्न असते. त्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी वरील लिखाणात ‘संत आणि गुरु व्यष्टीचे प्रारब्ध पालटू शकतात, तर अवतार समष्टीचे प्रारब्ध पालटू शकतात’, असे म्हटले आहे.’

– श्री. राम होनप (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्ता साधक), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : १.३.२०२६, वेळ : सकाळी १०.४५, कालावधी : १५ सेकंद)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक
  • सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’, याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात.