विस्मरणाविषयीचे विविध घटक, मानसिक आणि आध्यात्मिक विस्मरण यांतील भेद 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘मानसिक आणि आध्यात्मिक विस्मरण यांतील भेद कोणते ?’ (१६.१२.२०२१)

राम होनप : 

– श्री. राम होनप (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्ते साधक), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : १३.१.२०२६, वेळ : सकाळी १०.४१, कालावधी : २०  सेकंद आणि ज्ञानाचे टंकलेखन अन् संकलन करण्याचा एकूण कालावधी : ५३ मिनिटे)


सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना लहान-मोठ्या गोष्टी आठवत नसण्याची कारणे ?

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले 

मला अनेक लहान-मोठ्या गोष्टी आठवत नाहीत, याचे कारण काय ? (१६.१२.२०२१)

राम होनप : 

श्री. राम होनप

टीप १ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापेनेचे कार्य हाती घेतले आहे. त्याला विरोध करण्यासाठी सप्तपाताळांतील वाईट शक्ती सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांवर सूक्ष्मातून आक्रमणे करतात. तेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या देहाद्वारे चैतन्याचे पुष्कळ प्रक्षेपण होऊन वाईट शक्तींचा जोर न्यून होतो.

टीप २ – सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या देहाद्वारे प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यामुळे ‘साधकांना साधनेसाठी शक्ती मिळणे आणि त्यांच्या साधनेतील अडथळे न्यून होणे अन् वातावरणातील रज-तम न्यून होणे’, हे कार्य घडते. हे कार्य करतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांची निर्गुण स्थिती असते. तेव्हा त्यांचे गाढ ध्यान चालू असते. त्यामुळे त्यांना लहान-सहान गोष्टींचे विस्मरण होते.

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या बुद्धीचा नाश केल्यास त्यांना समष्टी कार्य करता येणार नाही’, या विचाराने पाताळांतील काही मोठ्या वाईट शक्ती सूक्ष्मातून सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या बुद्धीवर आक्रमणे करतात. या सूक्ष्म युद्धाचा परिणाम सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या संपूर्ण देहावर होतो. त्यामुळेही त्यांना लहान-सहान गोष्टींचे विस्मरण होते.’

– श्री. राम होनप (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्ते साधक), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : १३.१.२०२६, वेळ : सकाळी ११.५०, कालावधी : १० सेकंद)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक
  • सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’, याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात.