वॉशिंग्टन (अमेरिका) – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची मानसिकता पाकिस्तानचे संस्थापक महंमद अली जिना यांच्यासारखी आहे. त्यांना देशात फुटीरतावादी विचार वाढवायचा आहे. त्यांना रक्ताने माखलेला देश पहायचा आहे, असे विधान केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी येथे केले. हरदीप पुरी हे सध्या अमेरिकेच्या दौर्यावर आहेत.ते पुढे म्हणाले की, राहुल गांधी भारतात कधीही शिखांविषयी बोलले नाहीत. देशात काँग्रेसची सत्ता असतांना शीख लोक भयाच्या सावटाखाली जगत होते. वर्ष १९८४ मध्ये कॉग्रेसच्या राजवटीत शिखांवर आक्रमण झाले होते. शीख पगडी घालायलाही घाबरत होते.
Hardeep Puri Accuses Rahul Gandhi
Rahul Gandhi’s mentality is similar to Jinnah’s ! – Union Minister Hardeep Puri
Video Credits @Pamphlet_in#Rahul_Gandhi #RahulGandhi pic.twitter.com/TMDGa0crUq
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 18, 2024
१. राहुल गांधी यांनी गेल्या महिन्यात तीन दिवसांच्या अमेरिका दौर्यावर असतांना म्हणाले होते की, ‘भारतातील लढा हा शिखांना पगडी घालण्याची अनुमती देणार का ?, त्यांना हातात कडे (स्टिलचे गोल कडे) घालण्याची अनुमती दिली जाईल का ?’, यांविषयी आहे.
२. पुरी म्हणाले, ‘‘ मी ६२ वर्षांपासून पगडी घालतो. मला कधीही कोणतीही अडचण आली नाही. ‘कोणत्या शिखाने म्हटले आहे की, त्यांना भारतात पगडी किंवा कडे घालण्यापासून रोखले आहे ?’, असे राहुल गांधी यांना विचारले पाहिजे.