परदेशी अंशदान नियमन कायद्याच्या नियमात केला पालट
नवी देहली – केंद्र सरकारने परदेशी अंशदान नियमन कायद्याच्या (‘एफ्.सी.आर्.ए.’ अर्थात् ‘फारेन कंट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्ट’च्या) नियमांमध्ये मोठा पालट केला आहे. नवीन सुधारणांनुसार धर्मांतराला आता श्रद्धा आधारित कृतींचा भाग मानले जाणार नाही. सरकारच्या या पावलाचा थेट परिणाम अशा खासगी संस्था, धार्मिक संस्था आणि धर्मादाय संस्था यांवर पडेल ज्या विदेशी देणग्यांच्या माध्यमातून धर्मांतराचा कट रचतात.
🚨🇮🇳 Big Blow to Conversion Networks Using Foreign Funds!
The MHA has amended FCRA rules, making it clear that religious conversion is NOT a faith-based activity.
✅ Worship, prayer meetings, religious education, and spiritual programs remain permitted.
❌ Conversion… pic.twitter.com/yd7cNpeqDL
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 23, 2026
१. गृह मंत्रालयाने प्रसारित केलेल्या अधिसूचनेत असे स्पष्ट केले आहे की, नवीन नियमांनुसार धार्मिक शिक्षण, पूजा-अर्चा, प्रार्थना सभा, आध्यात्मिक कार्यक्रम, धार्मिक साहित्याचे ज्ञान देणे किंवा समुदाय आधारित धार्मिक सेवा या गोष्टी श्रद्धा आधारित कृतींच्या श्रेणीत रहातील.
२. असे असले, तरी कोणत्याही व्यक्तीवर धर्म परिवर्तनासाठी दबाव आणणे, त्याला प्रभावित करणे किंवा धर्म पालटण्यासाठी मोहीम चालवणे हे ‘धार्मिक सेवा’ या श्रेणीतून बाहेर मानले जाईल.
३. जर एखादी संस्था परदेशी देणग्यांचा वापर धर्मप्रसार किंवा धर्मांतर या संबंधित कृतींमध्ये करतांना आढळली, तर तिच्याविरुद्ध या कायद्यांतर्गत कारवाई केली जाऊ शकते.
४. अशा प्रकरणांमध्ये देणग्यांच्या वापराची चौकशी, परवान्याशी संबंधित कारवाई किंवा इतर कायदेशीर पावले उचलली जाऊ शकतात.

सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !
पहिल्या १० गायींसाठी ९० टक्के, तर उर्वरित १० गायींसाठी ७५ टक्के सरकारी अनुदान
गोव्यात कॅसिनोंमधील ‘गेमिंग’ क्षेत्रात २१ वर्षांखालील व्यक्तीला प्रवेश बंदी
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
हवामान खात्याचा नव्हे, तर पंचांगाचा अंदाज खरा ठरला ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
लातूर विभागाच्या उपसंचालक (माहिती) पदाचा सुनील कच्छवे यांनी पदभार स्वीकारला !