छत्रपती संभाजीनगर – गणेशोत्सवानिमित्त दैनिक ‘दिव्य मराठी’ आणि ‘कल्याण ग्रुप’द्वारे शहरात प्रथमच १ सहस्र ४०० किलो वजनाचा महामोदक सिद्ध करण्यात आला आहे. ग्रामदैवत संस्थान श्री गणेशमूर्तीला १६ सप्टेंबरच्या सकाळी या महामोदकाचा नैवेद्य दाखवला. त्यानंतर शहरात मिरवणूक काढण्यात आली. आविष्कार कॉलनीतील आनंद स्वीट्स येथे या मोदकाची निर्मिती करण्यात आली.
२ दिवसांत सिद्ध झालेला मोदक दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. हा मोदक १५ सप्टेंबर या दिवशी मिरवणुकीच्या माध्यमातून भाविकांपर्यंत पोचवला. सकाळी संस्थान गणपतीसमोर मोदकाचा नैवेद्य दाखवून महाआरती करण्यात आली. या वेळी मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती.