शिक्षकाच्या भ्रमणभाषमध्ये सापडले विद्यार्थिनींचे ३०० हून अधिक अश्लील व्हिडिओ !
बेळगाव – जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यात एका सरकारी शाळेचा शिक्षक महंमद सादिक मिया बेग याला विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या शिक्षकाने विद्यार्थिनींना शौचालयात जातांना त्यांच्या गुप्तांगांची छायाचित्रे काढण्यास सांगायचे. एवढेच नव्हे तर आरोपी महंमद सादिक याच्या भ्रमणभाषमध्ये विद्यार्थिनींचे ३०० पेक्षा अधिक अश्लील व्हिडिओ सापडले आहेत. तसेच विद्यार्थिनींच्या गुप्तांगांची १०० पेक्षा अधिक छायाचित्रे सापडली आहेत. (विद्यार्थ्यांवर नीतीमत्तेचे संस्कार करण्याचे दायित्व असलेले शिक्षकच अनीतीने वागू लागले, तर आदर्श भावी पिढी कोण घडवणार ! – संपादक)
Teacher Mohammad Sadiq arrested for sexually harassing female students in Chikodi (Karnataka) !
More than 300 obscene videos of female students found in the teacher’s mobile phone!
It will not be surprising if people demand that such persons should punished by stoning,… pic.twitter.com/rEa0L8wEOp
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 17, 2024
आरोपी महंमद सादिक हा विद्यार्थिनींशी कामुक आणि विकृत वर्तन करत होता. या शिक्षकाने गेल्या एक वर्षापासून ३० हून अधिक विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केले आहेत. एका विद्यार्थिनीने या वासनांध शिक्षकाने तिचा विनयभंग केल्याचे पालकांना सांगितल्यावर हे प्रकरण उघडकीस आले. सादिक याच्याविरुद्ध चिक्कोडी पोलीस ठाण्यात ‘पोक्सो’ कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सादिक याला सेवतून निलंबित करण्यात आले आहे.
संपादकीय भूमिकाअशा शिक्षकांना शरीयत कायद्यानुसार दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा करण्याची मागणी कुणी केली, तर त्यात आश्चर्य ते काय ? |