डफळापूर (सांगली) येथे बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांच्या निषेधार्थ हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने मोर्चा !

डफळापूर येथे मोर्चाच्या वेळी संघटित झालेले हिंदुत्वनिष्ठ

डफळापूर (जिल्हा सांगली), २८ ऑगस्ट (वार्ता.) – जत तालुक्यातील डफळापूर येथे सकल हिंदु समाज, विश्व हिंदु परिषद बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने बांगलादेशामध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ २७ ऑगस्ट या दिवशी मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात मोठ्या संख्येने हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते.

मोर्च्याच्या वेळी हिंदुत्वनिष्ठांनी फलकाद्वारे केलेल्या मागण्या !

या वेळी ‘बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर पावले उचला’, ‘बांगलादेशातील हिंदूंवरील अन्यायाचा विषय तातडीने संयुक्त राष्ट्र संघाकडे मांडा’, ‘बांगलादेशातील हिंदूचा नरसंहार थांबवा’, ‘तेथील हिंदूंना आवश्यक ती सुरक्षा पुरवा’, ‘बांगलादेशातील असुरक्षित हिंदूंना नागरिकत्व सुधारणा कायद्याद्वारे भारतात तात्काळ आश्रय द्या’, ‘बांगलादेशातील हिंदूंवरील वाढती आक्रमणे रोखा’, ‘बांगलादेशचा दुसरा पाकिस्तान होऊ देऊ नका’, ‘हिंदूंना आवाहन – बांगलादेशातील हिंदूंवरील वाढते अमानुष अत्याचार रोखण्यासाठी संघटित व्हा’, असे फलक हिंदुत्वनिष्ठांनी हाती धरले होते.