नवी देहली – देहलीच्या दयालपूर पोलीस ठाण्याच्या सीमेतील ‘तालीम उल् कुरान’ नावाच्या मदरशामध्ये ३ अल्पवयीन मुलांनी ५ वर्षांच्या मुलाची हत्या केली. पोलिसांनी तिन्ही मुलांना अटक केली आहे. मृत मुलगा रुहान वारंवार शिव्या देत होता. याचा राग मनात धरून या तिन्ही अल्पवयीन मुलांनी मिळून त्याची हत्या केली.
A 5-year-old boy was murdered by minors in a madrasa in Delhi.
Despite incidents of rape, murder and ji#@di terrorism occurring in madrasas, the Government continues to provide them with grants, which is shameful for the Government. It is now time to permanently close madrasas… pic.twitter.com/HmNCK1b5nD
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 25, 2024
मदरशातील सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे पोलिसांनी या मुलांना अटक केली. ‘रुहानच्या मृत्यूनंतर मदरशातून घरी जाण्यासाठी एक दिवसाची सुटी मिळेल’, असा विचारही या मुलांनी त्याची हत्या करतांना केला होता, असे अन्वेषणातून समोर आले आहे.
संपादकीय भूमिकामदरशांमध्ये बलात्कार, हत्या, जिहादी आतंकवाद आदी प्रकार घडत असतांनाही सरकार त्यांना अनुदान देते, हे सरकारला लज्जास्पद ! देशातील मदरसे आता कायमचे बंद करण्याचीच वेळ आली आहे. सरकार अशा प्रकारचा निर्णय घेण्याचे धाडस कधी दाखवणार ? |