Karnataka Congress Ivan D’Souza : कर्नाटकच्या राज्यपालांवर बांगलादेशच्या पंतप्रधानांसारखी परिस्थिती येऊ शकते ! – काँग्रेसचे नेते आमदार आयव्हान डिसोझा

काँग्रेसचे नेते आमदार आयव्हान डिसोझा व कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत

मंगळुरू – बांगलादेशच्या पंतप्रधानांवर जी परिस्थिती आली, तशीच परिस्थिती कर्नाटकच्या राज्यपालांवरदेखील येऊ शकते, असे वादग्रस्त विधान काँग्रेसचे नेते तथा विधान परिषदेचे सदस्य आयव्हान डिसोझा यांनी येथे केले. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात राज्यपालांनी अभियोगाची अनुमती दिल्याच्या निषेधार्थ मंगळुरूमध्ये लालबाग चौकात काँग्रेसने राज्यपालांच्या विरोधात आंदोलन केले. या आंदोलनाच्या वेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर टायर जाळून संताप व्यक्त केला. बसवर दगडफेक केली. बसच्या काचा फोडल्या. मंगळूर शहर महापालिकेसमोर आंदोलनाच्या वेळी त्यांनी रस्ता रोखून धरला.

आयव्हान डिसोझा पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने राज्यपालांना परत बोलवले नाही, तर आंदोलन आणखी तीव्र केले जाईल. राज्यपालांना हटवण्यासाठी बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते.

संपादकीय भूमिका

हे अप्रत्यक्षपणे हिंसेला प्रोत्साहन देणे नव्हे का ? अर्थात् कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने काँग्रेसच्याच नेत्यांवर कारवाई होणार नाही, हेही तितकेच खरे !