मुंबई – वैद्यकीय क्षेत्रातील हिंसाचार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येतील. आरोग्य कर्मचार्यांच्या सुरक्षेविषयी सरकार ठोस पावले उचलेल. आरोग्य कर्मचार्यांच्या सुरक्षाव्यवस्थेविषयी ‘ऑडिट’ केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशनद्वारे देशभर संप घोषित करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांची ‘मार्ड’ संघटनाही सहभागी झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी या संघटनेच्या पदाधिकार्यांशी संवाद साधला. या वेळी मुख्यमंत्र्यांनी १८ ऑगस्ट या दिवशी आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांच्यासमवेत चर्चा केली.