पाटोदा (अहिल्यानगर) येथे धर्मांधांचा बळजोरीने हिंदूंच्या जागेवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न !
अहिल्यानगर – येथील पाटोदा ता. जामखेड येथील अप्पासाहेब गव्हाणे यांच्या मालकीची ६ गुंठे जागा आहे. या जागेवर स्थानिक गफार मुद्दे खान पठाण, समीर मुद्दे खान पठाण यांनी अतिक्रमण केलेले आहे. या जागेचा वाद न्यायालयात चालू आहे. या जागेवर १५ दिवसांपूर्वी या धर्मांधांनी वाशिंग सेंटरचा रॅम्प (उतार) बांधला हे अप्पासाहेब यांच्या लक्षात आल्यावर ते याचा जाब विचारण्यास गेले असता अतिक्रमण केलेले धर्मांध गफार मुद्दे खान पठाण, खुर्शीद तय्यब पठाण, मयूर तय्यब पठाण, तैशीफ रज्जाक यांनी अप्पासाहेबांना लोखंडी रॉड आणि लाकडी काठ्या यांनी मारहाण केली. (लोकसंख्येत अल्पसंख्य धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! आधी अवैधरित्या हिंदूंच्या मालमत्ता कह्यात घ्यायच्या आणि विचारणा केल्यास मारहाण करायची ही धर्मांधांची नवी खेळी मोडून काढण्यासाठी त्यांच्यावर उत्तरप्रदेश प्रमाणे कठोर कारवाई हवी. – संपादक) यामध्ये अप्पासाहेबांना डोक्याला मार लागला असून त्यांच्या उजव्या हाताचे हाड मोडले आहे. या संदर्भात आप्पासाहेब गव्हाणे यांनी जामखेड पोलीस ठाण्यात एफ्.आय.आर्. (प्रथमदर्शनी अहवाल) प्रविष्ट केला असून सध्या ते जामखेड येथील ‘पन्हाळकर हॉस्पिटल’ या ठिकाणी उपचार घेत आहेत.