१. सकारात्मकता वाढवण्यासाठी स्वयंसूचना परिणामकारक असणे महत्त्वाचे असल्याची जाणीव होणे
‘२०.१.२०२४ या दिवशी शिबिरात सकाळी श्री. चेतन राजहंस (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४० वर्षे) हे ‘चुकांचा अभ्यास कसा करावा ?’ या सत्रात मार्गदर्शन करत होते. चुका होण्यामध्ये स्वभावदोष कारणीभूत असल्याने त्यांच्या मुळाशी जातांना ‘आध्यात्मिक दृष्टीने चिंतन कसे करायचे ?’, हे त्यांनी शिकवले. चुका होण्यामागे ‘कोणत्या गुणाचा अभाव होता ?’, हे शोधून स्वतःमध्ये सकारात्मकता वाढवण्यासाठी परिणामकारक स्वयंसूचना महत्त्वाची आहे’, हे त्यांनी प्रेमाने समजावून सांगितले. ते १०० टक्के वस्तूनिष्ठ निरीक्षण शिकवत होते.
२ . श्री. चेतन राजहंस यांच्या जागी मला संपूर्ण व्यासपीठ व्यापलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेच दिसत होते.
३. श्री. चेतन राजहंस यांच्या माध्यमातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी इच्छा पूर्ण करणे
श्री. चेतन राजहंस बोलत असतांना मला ‘त्यांचा आवाज म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचाच आवाज आहे’, असे पूर्ण वेळ वाटत होते. मला नेहमी वाटायचे, ‘परात्पर गुरुदेव अभ्यासवर्ग घेत होते. तेव्हा मला त्यांना प्रत्यक्ष अनुभवता आले नाही !’ चेतनदादांच्या मार्गदर्शन सत्रात ‘परात्पर गुरुदेवांनीच चेतनदादांच्या माध्यमातून माझी इच्छा पूर्ण केली’, यासाठी परात्पर गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. सोनाली पोत्रेकर, फोंडा, गोवा. (२१.१.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |