बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अत्याचाराचे प्रकरण
सांगली, १२ ऑगस्ट (वार्ता.) – बांगलादेशातील हिंसाचाराच्या प्रकरणी शासनाने हस्तक्षेप करावा, हिंदु मंदिरांवर आक्रमण करून देवतांची विटंबना करणार्या तोडफोडीचा निषेध, हिंदूंना संरक्षण देण्यात यावे, भारतात घुसखोरी केलेल्या बांगलादेशींना शोधून त्यांना तात्काळ बंगलादेशात परत पाठवा, या तसेच अन्य मागण्यांसाठी बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अत्याचारांच्या निषेधार्थ १३ ऑगस्टला सांगलीत ‘निषेध सभे’चे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा सायंकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ चालू होईल. या सभेसाठी सर्व हिंदूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन नितीन शिंदे यांनी केले आहे.