मुंबई – येथील कामाठापुरी या भागात भंगाराचे दुकान असलेल्या ४८ वर्षीय कामील कुरेशी या व्यक्तीने फूस लावून २२ वर्षीय हिंदु युवतीला पळवून नेलेे. कायद्याच्या दृष्टीने ही युवती सज्ञान असली, तरी कुरेशी याने मुलीच्या आई-वडिलांना कोणतीही कल्पना न देता मुलीला समवेत नेले. याविषयी माहिती देणारा व्हिडिओ एका युवतीने फेसबूकवरून प्रसारित केला आहे. या युवतीने स्वत:ची ओळख अधिवक्त्या सिंड्रेला गवळी अशी सांगितली असून त्या मानवाधिकार आयोगाच्या कार्यकर्त्या असल्याचे म्हटले आहे. हा ‘लव्ह जिहाद’चा प्रकार असल्याचेही अधिवक्त्या सिंड्रेला यांनी नमूद केले.
(सौजन्य : SHAKHA9 NEWS)
१. कामील कुरेशी याने मुलीला ज्या भागात ठेवले आहे, त्या कामाठीपुरा भागात वेश्या व्यवसाय चालतो. ज्या ठिकाणी कुरेशी याचे भंगाराचे दुकान आहे, त्या ठिकाणी अधिवक्त्या सिंड्रेला यांनी हा व्हिडिओ चित्रीत केला आहे.
२. या व्हिडिओमध्ये अधिवक्त्या सिंड्रेला यांच्या समवेत एक पुरुषही आहे. ते त्या मुलीचे वडील असल्याचे सिंड्रेला यांनी सांगितले.
Mumbai: Kamil Qureshi, a scrap dealer, abducts a Hindu girl by deceit
There is a possibility of this incident to be one of Love Ji#ad.
With such cases on a rapid rise in Maharashtra, it is the need of the hour to enact a stringent law against Love Ji#ad.
To curb these attacks… pic.twitter.com/WN2GIZTbX4
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 4, 2024
३. कुरेशी सदनिका आणि सोने यांचे आमीष दाखवून मुलीला घेऊन गेला अन् तिला एका खोलीमध्ये कोंडून ठेवले. हिंदु युवतीचा दूरभाषही त्याने बंद ठेवला आहे. कुरेशी तिला दुबई येथे घेऊन जाणार असून तेथे तिची विक्री केली जाऊ शकते, अशी भीती अधिवक्त्या सिंड्रेला यांनी या व्हिडिओमध्ये व्यक्त केली आहे.
४. या व्हिडिओवरून पोलिसांनी चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, असे मत अनेकांनी सामाजिक माध्यमांवरून व्यक्त केले आहे.
संपादकीय भूमिकाही घटना लव्ह जिहादची असल्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात या प्रकाराला ऊत आला असून कठोरात कठोर लव्ह जिहाद विरोधी कायदा करणे काळाची आवश्यकता आहे. हिंदूंच्या मुळावर उठणार्या या प्रकाराला लगाम लावण्यासाठी आता हिंदूंनी संघटित होऊन सरकारवर कायदा करण्यासाठी दबाव आणला पाहिजे. |