तेलंगाणातील चिलकुर येथील घटना
चिलकुर (तेलंगाणा) – चिलकुर बालाजी मंदिराजवळील भूमी ही वक्फ मंडळाची भूमी असल्याचे घोषित करून तेथे मशीद बांधली जात होती. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी याचा निषेध करत काँग्रेस सरकारला चेतावणी दिली. कार्यकर्त्यांनी म्हटले, ‘मंदिराच्या पावित्र्याशी कोणत्याही प्रकारची छेडछाड खपवून घेतली जाणार नाही. याचे गंभीर परिणाम होतील.’ तसेच त्यांनी बांधकाम चालू असलेली मशीद पाडण्याची मागणी केली होती. जिल्हाधिकार्यांनी या प्रकरणाची तात्काळ नोंद घेत मशिदीचे बांधकाम थांबवले आहे.
१. चिलकुर बालाजी देवस्थानम्चे पुजारी सी.एस्. रंगराजन् म्हणाले की, चिलकुर बालाजी मंदिराभोवतीची भूमी पवित्र आहे आणि ती फार पूर्वीपासून अस्तित्वात आहे. तिरुपती बालाजी मंदिराच्या आजूबाजूची भूमी ज्याप्रमाणे पूजनीय आहे, त्याचप्रमाणे चिलकुर बालाजी मंदिराच्या सभोवतालचा परिसर तितकाच पवित्र आहे. भगवान व्यंकटेश्वर चिलकुर येथे स्वतः प्रकट झाल्यामुळे ते या भूमीचे मालक आहेत. हे इतर धर्मियांच्या प्रार्थनास्थळांचे ठिकाण नाही. मंदिराचे पावित्र्य राखण्याचे दायित्व पोलीस, महसूल आणि इतर विभाग यांचे आहे. मंदिराच्या २ किलोमीटर परिसरात नवीन मशीद बांधली जात आहे. तेसुद्धा आमचे बांधव आहेत आणि आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो आणि त्यांचा आदर करतो; परंतु सरकार आणि मशिदीचे बांधकाम करणारे यांना विनंती आहे की, भूमीचे पावित्र्य आणि मालकी राखली पाहिजे. आम्ही प्रशासन आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांना असे आवाहन करतो. येथे इतर कोणत्याही धर्माचे नवीन प्रार्थनास्थळ बांधले जाणार नाही, याची सरकारने काळजी घ्यावी.
२. बजरंग दलाचे राज्य संयोजक शिवरामुलू यांनी खासगी भूमी वक्फ भूमी असल्याचा अहवाल देणार्या स्थानिक तहसीलदारांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी केली. याखेरीज या प्रकरणी मुसलमान आमदारांचे म्हणणे ऐकून घेऊन त्या ठिकाणी बोअरवेल खोदण्याचे काम चालू असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार या सर्व काळात पोलीस घटनास्थळी होते आणि बांधकाम करत असतांना स्थानिक लोकांना घाबरवत होते.
संपादकीय भूमिकातेलंगाणामध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने धर्मांध मुसलमान अशा प्रकारचे धाडस करत आहेत, हे लक्षात घ्या ! |