राज्यातील ७५ सहस्र गोविंदांना शासनाकडून विम्याचे संरक्षण !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई, २५ जुलै (वार्ता.) – दहीहंडी उत्सवामध्ये मानवी मनोरे रचतांना अपघात किंवा दुर्घटना घडून दुर्दैवी मृत्यू आल्यास, २ अवयव किंवा १ डोळा निकामी झाल्यास, किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास शासनाकडून १० लाख रुपये इतके विम्याचे संरक्षण देण्यात आले आहे. एक हात, एक पाय किंवा एक डोळा गमावल्यास ५ लाख रुपये इतके विम्याचे संरक्षण देण्यात आले आहे. राज्यातील ७५ सहस्र गोविंदांसाठी शासनाने विम्याचे संरक्षण दिले आहे. वर्ष २०२३ मध्येही राज्यशासनाने गोविंदांना विम्याचे संरक्षण दिले होते.