
बळ्ळारी (कर्नाटक) – आंध्रप्रदेशातील मंत्रालय येथे श्री राघवेंद्र स्वामी यांच्या मठात यात्रा असते. त्याला जाणार्या भाविकांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न कर्नाटकच्या बळ्ळारी जिल्ह्यातील सिरगुप्पा तालुक्यातील तिक्कलकोटे येथे झाला. या प्रकरणी पोलिसांनी हुसेन भाषा नावाच्या एका मुसलमानाला अटक केली, तर या प्रकरणातील अन्य एक आरोपी पसार झाला आहे. १८ जुलै या दिवशी या दोघांनी पायी मंत्रालयाकडे जाणार्या यात्रेकरूंना इस्लाम धर्माचे महत्त्व सांगून त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
हिंदु यात्रेकरू हातात भगवे झेंडे घेऊन सिरगुप्पा राष्ट्रीय महामार्गाने मंत्रालय येथे मंदिरात जात होते. या वेळी तेक्कलकोटे शहरातील हुसेन भाषा (४४ वर्षे) आणि साई बाबा (२४ वर्षे) यांनी यांत्रेकरूंमध्ये इस्लामचा प्रचार केला. या प्रकरणी एक यात्रेकरू गादिलिंगप्पा यांनी तेक्कलकोटे पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदवून हुसेन भाषा याला अटक केली. दुसरा आरोपी पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
संपादकीय भूमिकाकर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार असल्यामुळे असे प्रकार वाढल्यास आश्चर्य वाटणार नाही ! |
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !