मंगलोर (उत्तराखंड) विधानसभा पोटनिवडणूक
हरिद्वार (उत्तराखंड) – हरिद्वार जिल्ह्यातील हिंदूबहुल मंगलोर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार काझी महंमद निजामुद्दीन विजयी झाले. या विजयानंतर मंगलोरमध्ये काझी यांची विजयी मिरवणूक निघाली, त्यात काँग्रेसच्या मुसलमान कार्यकर्त्यांनी हिंदूंवर आक्रमणे केली. या प्रकरणी पोलिसांनी इरफान, अबरार, कामिल, शमसाद आणि इरफान नावाच्या आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर गुन्हेगारांना ओळखण्यासाठी आणि त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी अनेक पथके सिद्ध केली आहेत. विधानसभा पोटनिवडणुकीतील विजयानंतर काँग्रेसच्या समर्थकांनी अनुमतीविनाच विजयी मिरवणूक काढली होती. (गांधीवादी आणि राज्यघटनाप्रेमी राहुल गांधी यांच्या काँग्रेसचे खरे स्वरूप ! – संपादक)
काँग्रेसच्या विजयानंतर आम्हाला कायदा मोडण्याचा परवाना मिळाला ! – काझी निजामुद्दीन यांचे समर्थककाझी निजामुद्दीन यांच्या मुसलमान समर्थकांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले होते की. आम्ही कायदा मोडणार आहोत; कारण विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या विजयानंतर आमच्याकडे तसे करण्याचा ‘परवाना’ आहे. (अशांची आमदारकी रहित होऊन त्यांना कारागृहात पाठवले पाहिजे ! – संपादक) संपादकीय भूमिकाएखाद्या हिंदुत्वनिष्ठ पक्षाच्या उमेदवाराला विजय मिळाल्यावर कधी असे म्हटले जाते का ? हिंदू कार्यकर्ते कधी असे म्हणतात का ? तरीही या देशात हिंदूंना ‘आतंकवादी’, ‘तालिबानी’ म्हटले जाते, तर धर्मांध मुसलमानांना ‘असुरक्षित’ ठरवले जाते ! |
संपादकीय भूमिकाकाँग्रेसचा विजय झाल्यावर हिंदूंसाठी ती इस्लामी राजवट असते, हेच यावरून सिद्ध होते ! तरीही हिंदू पुनःपुन्हा काँग्रेसला विजयी करून आत्मघात करून घेत आहेत ! |