हिंदुत्वनिष्ठांच्या संघटित प्रयत्नांमुळे श्री दत्तगुरूंची मूर्ती त्याच ठिकाणी स्थापन !
पुणे – येथील सत्यम इंडस्ट्रियल इस्टेट, एरंडवणे या ठिकाणी रस्त्यालगत एका इमारतीच्या आवारात श्री दत्तात्रयांचे छोटे मंदिर गेल्या ३०-३५ वर्षांपासून अस्तित्वात होते; परंतु जॉन थॉमस या ख्रिस्ती व्यक्तीच्या एका पत्रावर प्रशासनाने दत्तगुरूंचे मंदिर रात्री १२ वाजता पाडले. पुणे महानगरपालिकेने रात्री १२ वाजता या मंदिरावर कारवाई चालू केली.
हे समजताच लगेचच ‘विश्व हिंदु मराठा संघा’चे पदाधिकारी आणि सदस्य घटनास्थळी आले अन् त्यांनी कारवाई थांबवण्यासाठी प्रयत्न चालू केले.
Pune becoming a second Pakistan ?
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 7, 2024
(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून सर्वांना वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहेत. – संपादक)
पोलीस- प्रशासनाने सर्वांना रोखून धरले आणि सदर मंदिर रस्त्यात नसतांनाही, तसेच कुणाला कसलीही माहिती न देता मंदिर पाडून दत्तगुरूंची मूर्ती नेली. त्यानंतर सकल हिंदु समाज आणि संघटना यांच्या वतीने त्वरित तेथील ‘रस्ता बंद’ आंदोलन करण्यात आले आणि प्रशासनावर आणलेल्या दबावानंतर काहीच घंट्यांत दुपारी श्री दत्तगुरूंची मूर्ती महानगरपालिका प्रशासनाकडून परत मिळवून त्याच पडलेल्या मंदिराच्या ठिकाणी स्थापित करण्यात आली. वरपेभूषण नावाच्या ‘इंस्टाग्राम’ खात्यावरून ही माहिती प्रसारित झाली आहे. अन्य सामाजिक माध्यमांवरही ही माहिती प्रसारित होत असून प्रशासनाच्या हिंदूविरोधी कारवाईविषयी हिंदुत्वनिष्ठांनी संताप व्यक्त केला आहे.
त्यानंतर तेथे श्री दत्तगुरूंची आरती आणि छत्रपती शिवरायांची ‘शिववंदना’ आयोजित करण्यात आली. त्याच ठिकाणी भव्य मंदिर जिर्णोद्धाराचा संकल्प झाला आणि सर्वांनी यात सहकार्य करून योगदान देण्याचे ठरवले. यावर पुणे महानगरपालिकेची भूमिका अद्याप समजू शकली नाही.
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या मंदिरावर तत्परतेने कारवाई करणारे प्रशासन अवैध मजारी, दर्गे, मदरसे किंवा अन्य पंथियांची प्रार्थनास्थळे यांवर मात्र कारवाई करण्यास घाबरते ! |