
अमेरिका – येथील सॅनहोसे येथे २९ जून या दिवशी श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्या धामचे सन्माननीय कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांना संतश्रेष्ठ पुरस्काराने ‘पूर्णवादी नागरी सहकारी बँके’चे उपाध्यक्ष सन्मानीय डॉ. लक्ष्मीकांत पारनेरकर यांच्या हस्ते गौरवण्यात आले. डॉ. लक्ष्मीकांत पारनेरकर यांच्या हस्ते प.पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांना २०२४ चा ‘श्री. ग.का. आपटे स्मृती संतश्रेष्ठ’ पुरस्कार देण्यात आला. अमेरिकेतल्या बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात हा सन्मान सोहळा झाला. कार्यक्रमास देश-विदेशांतील आणि विशेष करून अमेरिका खंडातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. भारतातून विशेष करून अधिवेशनासाठी आलेल्या अतिथींमध्ये राज ठाकरे, सुनील गावस्कर यांची उपस्थिती होती. या दोन्ही अतिथींची डॉ. लक्ष्मीकांत पारनेरकर यांनी भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली.
या वेळी बृहन महाराष्ट्र मंडळ उत्तर अमेरिकेच्या वतीने डॉ. पारनेरकरांचा सत्कार गौर गोपाळ दास स्वामी यांच्या हस्ते करण्यात आला. फायझर या नामांकित अमेरिकी आस्थापनाचे सन्माननीय माजी संचालक डॉ. मकरंद जावडेकर आणि ‘सीएम इन्स्टिटयूट यू.एस्.ए.’चे नवनिर्वाचित अध्यक्ष सुनील देशमुख व्यासपिठावर उपस्थित होते.
भारतासमवेतच्या सीमावादात ब्रिटनला मध्यस्थ बनवू इच्छित नाही ! – Balen Shah
मी ट्रम्प यांच्या आणि ट्रम्प माझ्या सांगण्यानुसार काम करत नाही ! – Netanyahu
हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यास संपूर्ण इराण नष्ट केला जाईल ! : Donald Trump
Bhopal Terror Module : ‘पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या ‘मिशन-२०४७’नुसार सर्व आतंकवादी बाहेर येऊन सत्ता उलथून टाकतील !
(म्हणे) ‘भारताविरोधात युद्ध पुकारण्याविना कोणताच पर्याय रहाणार नाही !’ – Khawaja Asif
अमेरिकेने कितीही दबाव आणला, तरी लेबनॉनमधून मागे हटणार नाही ! – Israel