Faridabad Attack : धर्मांध मुसलमानांकडून मंदिराच्या पुजार्‍याचा शिरच्छेद करण्याचा प्रयत्न

  • फरीदाबाद (हरियाणा) येथील श्री कालिमाता मंदिराबाहेरील घटना

  • पुजारी गंभीररित्या घायाळ

फरीदाबाद (हरियाणा) – येथे २८ जून या दिवशी इक्बाल आणि मेहताब यांनी त्यांच्या साथीदारांसह रवि भगत या पुजार्‍याचा शिरच्छेद करण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंदिरासमोरच घडली. यात गंभीररित्या घायाळ झालेले पुजारी रवि भगत यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. पोलीस मुसलमान आरोपींचा शोध घेत आहेत. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी गोरक्षक बिट्टू बजरंगी यांनी फरीदाबादमधील घटनास्थळी हिंदु पंचायत आयोजित करण्याची घोषणा केली आहे.

१. येथील जनता वसाहतीत श्री कालिमातेचे मंदिर आहे. रवि भगत या मंदिराची देखभाल आणि पूजा करतात. २८ जूनच्या रात्री ते मंदिराबाहेरील खाटेवर झोपले होते.

या वेळी इक्बाल, मेहताब आणि त्यांचे साथीदार भगत यांच्याजवळ आले आणि त्यांना पकडून चाकूने त्यांची मान कापणे चालू केले. या वेळी त्यांच्या लहान मुलीने आरडाओरड केल्यावर काही जण आल्यावर आरोपी पळून गेले.

२. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंतच्या अन्वेषणात धार्मिक कट्टरतेचा कोणताही पुरावा समोर आलेला नाही; मात्र सर्व पैलूंचा अभ्यास करण्यात येत आहे.

संपादकीय भूमिका

हरियाणामध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंवर अशी आक्रमणे होऊ नयेत, असेच हिंदूंना वाटते !