Delhi Gang Rape : देहलीत १० वर्षांच्या मुलीची सामूहिक बलात्कारानंतर हत्या

दोन्ही आरोपींना अटक

नवी देहली – देहलीतील नरेला परिसरात एका १० वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार आणि नंतर तिची हत्या करण्यात आली. रात्री ही मुलगी बेपत्ता झाली होती. शोध चालू असतांना रात्री उशिरा एका मोकळ्या जागेत तिचा मृतदेह आढळून आला. मुलीचे डोके ठेचून हत्या करण्यात आली. पोलिसांनी तिच्या शेजारी रहाणार्‍या राहुल याला अटक केली. त्याने त्याचा मित्र देवदत्तसमवेत या मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केली. पोलिसांनी देवदत्त यालाही अटक केली आहे.

संपादकीय भूमिका

अशा वासनांधांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे !