पुसेसावळी (सातारा) दंगल आणि हत्या प्रकरणी ६ आठवड्यांत अहवाल द्या ! – मुंबई उच्च न्यायालय

मुंबई उच्च न्यायालय

सातारा, २४ जून (वार्ता.) – भाजपचे नेते विक्रम पावसकर यांनी सातारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी केलेल्या भाषणांमुळे हिंदु-मुसलमान तणाव वाढल्याचा आरोप आहे. सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी येथे घडलेल्या हत्याकांडामध्ये विक्रम पावसकर यांचा असणारा सहभाग स्पष्ट करण्यासाठी सरकारी अधिवक्ता वेणेगावकर यांनी कलम १७४ (८) प्रमाणे पुढील अन्वेषण करावे. या अन्वेषणाचा अहवाल ६ आठवड्यांमध्ये उच्च न्यायालयामध्ये सादर करावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपिठाने दिला आहे.

सातारा पोलिसांची संशयास्पद भूमिका लक्षात घेऊन इस्लामपूर येथील राष्ट्रीय काँग्रेसचे शाकीर तांबोळी यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका प्रविष्ट केली होती. या पार्श्वभूमीवर हा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.